खातं कुठलं हे महत्वाचं नाही, चालवणारा.., खातेवाटपाच्या वादावर फडणवीसांचं स्पष्टीकरण

नुकताच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिपद विस्तार झाला आहे. त्यानंतर चार दिवसांहून अधिक काळ लोटला तरी खाते वाटप झालं नव्हतं. मात्र, आज सरकारचे खाते वाटप देखील झाले आहे. या खाते वाटपात देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची खाती स्वतः कडे घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह आणि अर्थ खाते स्वतःकडे घेतले. तर शिंदे गटाला साधारण खाती देण्यात आली. एवढेच नाही तर भाजपच्या इतर जेष्ठ नेत्यांना या खातेवाटपात दुय्यम स्थान देण्यात आलं. त्यामुळे फडणवीस यांच्याबाबत मीडियावर चर्चा होऊ लागली आहे.

त्यानंतर, फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत खाते वाटपाबाबत आपली प्रतिक्रिया दिली. म्हणाले, खातेवाटपावरून आमच्यात कोणताही वाद नाही. आमच्या मंत्रिमंडळाचा छोटा विस्तार झाला आहे. त्यामुळे मंत्र्यांवर अधिकचा भार टाकण्यात आला आहे.

मिळालेल्या खात्याला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढील विस्तार केल्यावर अधिकचे खाते दुसऱ्या मंत्र्याला दिले जाईल. खात कुठले हे महत्त्वाचे नाही. तर खातं चालवणारा व्यक्ती योग्य पाहिजे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्यात खाते वाटपावरून कोणताही वाद नाही. त्यांना वाटलं तर आम्ही आमचे खात देऊ तसेच आम्हाला वाटलं तर आम्ही त्यांचे खातं मागून घेऊ. विस्तारात आमचे खाते आमच्या लोकांना मिळतील. तर त्यांचे खाते त्यांच्या लोकांना मिळतील. मात्र, मंत्रिमंडळाचा पुढचा विस्तार कधी होईल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगतील, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच म्हणाले, आता जे झालं ते झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय बोलले हे मला माहिती नाही. मात्र, अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत काहीही ठरलं नव्हतं. त्याचा मी साक्षीदार आहे. सर्व वाटाघाटी मी केली होती. आता जे झालं ते झालं, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.