Uddhav Thakre: एक गुलाब गेला तर फरक पडत नाही, माझ्याकडे गुलाबाचे झाड, मी नवीन गुलाब फुलवीन – उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे(Uddhav Thakre): जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मातोश्रीवर गेले असताना उद्धव ठाकरेंनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेला संपविण्याचं कारस्थान रचलं गेलं आहे. पण त्यांना माहिती नाही, अशी कित्येक संकटे आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. ज्यांना मोठे केले, ते आता आपल्यासोबत नाहीत.

मात्र, त्यांना मोठे करणारे तुम्ही माझ्यासोबत आहात. तुमच्याच बळावर त्यांना धडा शिकवू. आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पहा. गुलाबाचे झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलविन, अशी आशा व्यक्त करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बंडखोर आमदार, माजी मंत्री गुलाबराव पाटलांना टोला मारला.

जळगावचे उपमहापौर कुलभूषण पाटील, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, हर्षल माने, जिल्हा महानगरप्रमुख शरद तायडे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, दीपक राजपूत इत्यादी पदाधिकारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, शिवसेना पक्षाची लढाई दोन पातळीवर सुरू आहे. रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई. या दोन्ही लढाईत आपण कुठेही मागे पडणार नाहीत. न्यायालयीन लढाईत दिग्गज वकील आपल्यासाठी कायद्याची लढाई लढत आहेत. न्याय देवतेवर आपला विश्‍वास आहे. तुमची साथ अशीच माझ्यासोबत राहू द्या. तुम्ही पक्षबांधणीचे काम जिल्ह्यात जोरात करा. मला असेच आणखी प्रतिज्ञापत्राचे संपूर्ण गठ्ठे हवे आहेत.

शिवसेनेबद्दल बोलताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले की, “महाराष्ट्रात शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे.” त्यांना प्रत्युत्तर देत शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे म्हणाले, आतापर्यंत शिवसेना फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरु आहेत, हे मी आधीच बोललो होतो.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की, शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की, अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. राजकारणात हार जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होतेय, असंही ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या
Shatrughan Sinha: ‘या’ अभिनेत्रीच होणार होत शत्रुघ्न सिन्हासोबत लग्न; पण तिने केल पाकिस्तानी क्रिकेटरसोबत लग्न
Scam: मधल्या वेळात भेटणाऱ्या भोजनात एका शिक्षकाने कसा केला ११ कोटींचा घोटाळा, ऐकून थक्क व्हाल
Bengali actress: एकीने न्युड होऊन गोंधळ घातला तर एकीने शिवलींगावर लावले कंडोम, वाचा सगळ्यात वादग्रस्त अभिनेत्रींबद्दल..
संजय राऊतांच्या जागी सेनेला मिळाला पर्याय; शिवसेनेत आता ‘या’ २ तोफा धडाडणार