आयटी कंपनी(IT Company): शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातील अनेक मुलं-मुली नोकरीच्या शोधात शहराकडे वाटचाल करतात. नोकरीसाठी धक्के खातात. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागातील मुलामुलींना कंपनीत काम मिळावे, म्हणून संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पारेगाव खुर्द या खडकाळ माळरानावर वसलेल्या गावात ‘बाप’ नावाची आयटी कंपनी एका तरुणाने सुरू केली आहे.
शिक्षण पूर्ण करण्याकरिता एज्यूकेशन लोन काढावे, अशा विचाराने त्याने अनेक बँकांचे उंबरठे झिजवले. मात्र ‘तुमचा बाप नोकरी करत नाही, तुमच्या बापाकडे सॅलरी स्लिप नाही’ असे सांगत या बँकांनी त्याला लोन मनी केले नाही. पण तो हिंमत हरला नाही. न हरता त्याने परिस्थितीशी सामना केला . अमेरिकेत आयटी कंपनीत नोकरी करता करता त्याने स्वतःची आयटी कंपनी सुरू केली. यशाची शिखरे गाठत असताना आपले आई-बाप आणि गावाला मात्र तो विसरला नाही.
त्याने सुरु केलेली आयटी कंपनी ग्रामीण भागातील मुलांसाठी फार महत्वाची ठरली. ग्रामीण भागातील मुलामुलींना शहरात जाऊन नोकरीसाठी धक्के खावे लागतात, याची जाणीव त्याला होती. त्यामुळे त्याने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असणाऱ्या पारेगाव खुर्द या खडकाळ माळरानावर वसलेल्या गावात ‘BAAP’ नावाची आयटी कंपनी सुरू केली आहे. (‘BAAP’-बिझनेस एप्लिकेशन्स अँड प्लॅटफॉर्म)
आई वडिलांनी लहानपणापासून केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून त्याने मेहनतीचे फळ आईवडिलांना दिले. या तरुणाचे नाव रावसाहेब घुंगे आहे. त्याच्या कंपनीचा उदघाट्न सोहळा मोठ्या थाटात पार पडला. मंचावर उपस्थित मान्यवरांसह त्याचे आई वडील सुद्धा होते.
एकेकाळी बँकांनी लोन नाकारले. कारण बाप नोकरीला नाही, सॅलरी स्लिप नाही, म्हणून आज त्याच रावसाहेब घुंगेंनी आपल्या बापाला स्वतः सुरु केलेल्या कंपनीचे डायरेक्टर बनविले. कंपनीच्या प्रवेशद्वारावर आपल्या शेतकरी बापाच्या टोपीची प्रतिकृती लावून, रावसाहेब घुंगेंनी आपल्या आईवडिलांच्या कष्टाची परतफेड केली. त्यांना जीवनातला सर्वात मोठा आनंद दिला.
महत्वाच्या बातम्या
Rape Case: बलात्कारातून जन्मलेल्या मुलाने २७ वर्षांनी शोधली स्वतःची खरी आई; जन्मदात्या बापाचाही घेतला सूड
Sunroof: अल्टो आणि वॅगनरमध्येही बसवता येणार सनरूफ; कमी किंमतीत घ्या आलिशान गाड्यांच्या सुविधांचा आनंद
Shivsena: ज्या पक्षातून निवडूण आला त्यालाच बाजूला टाकणे हा तर लोकशाहीला धोका; सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाला सुनावले
Shivsena: ‘वेळ आल्यावर गाड्याच नाही तर तोंडही फोडू, तोंडाला काळे फासू’; गद्दारांविरोधात शिवसैनिक आक्रमक