टीम इंडियाचा सलामीवीर इशान किशनने एकदिवसीय क्रिकेटमधील कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले. या फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील 9वा फलंदाज ठरला. बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इशानने 126 चेंडूत 200 धावांचा आकडा पार केला.
यापूर्वी, वनडे क्रिकेटमधील त्याची सर्वात मोठी खेळी या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळली होती. पण त्याने द्विशतक झळकावून कारकिर्दीतील ऐतिहासिक विक्रम केला. रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवागनंतर भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
द्विशतक झळकावल्यानंतर काय म्हणाला इशान किशन?
त्याचवेळी द्विशतक झळकावल्यानंतर इशान किशन म्हणाला, ‘ही विकेट फलंदाजीसाठी खूप चांगली होती. माझा हेतू अगदी स्पष्ट होता. चेंडू माझ्याकडे आला तर मी त्याला फटका मारून प्रत्युत्तर देईन. रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवाग अशा महान खेळाडूंमध्ये माझे नाव आल्याने मी धन्य झालो.
15 षटके बाकी असताना बाद झालो याचे मला वाईट वाटत होते. नाहीतर मी 300 धावाही करू शकलो असतो. मी स्वतःवर जास्त दबाव घेतला नाही. मला फक्त संधीचा फायदा घ्यायचा होता. असेही इशान किशन म्हणाला.
द्विशतकाचे श्रेय या खेळाडूला दिले
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना आपल्या द्विशतकाचे श्रेय देताना किशन म्हणाला, ‘विराट भाईसोबतची फलंदाजी खूप चांगली होती. त्याला खेळाची चांगली समज आहे. मी ९० धावांवर असताना तो मला शांत करत होता. मला शतक षटकाराने करायचे होते. पण तो म्हणाला की हे माझे पहिले शतक आहे. १/२ धावा काढत ते शांततेत पुर्ण कर.
सूर्याभाईशीही माझं बोलणं झालं. तो म्हणाला की जेव्हा तुम्ही खेळापूर्वी सराव करता तेव्हा तुम्हाला चेंडू चांगला दिसतो. रोहित शर्मा आणि वीरेंद्र सेहवागनंतर भारतीय क्रिकेट संघात सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या-
solapur : जुळ्या बहिणींशी लग्न करणाऱ्या अतुलवर गुन्हा दाखल केल्यामुळे कोर्टाने पोलिसांना झापले; कायदाच सांगितला
anurag kashyap : दक्षिणात्य चित्रपटांचे यश बॉलिवूडला पचेना? अनुराग म्हणाला, कांतारा बनवला पण पुढचे चित्रपट हे…
चौथीतली मुलगी गेली पोलीस ठाण्यात; म्हणाली, माध्यान्ह भोजनात खूप किडे असतात, आणि मग…