Share

VIDEO: ईशा देओलने आई हेमा मालिनीसोबत केला धूम गाण्यावर डान्स, पाहून चाहतेही झाले थक्क

बॉलिवूड अभिनेत्री ईशा देओल अनेकदा तिची आई हेमा मालिनीसोबत दिसते. ज्यावरून या दोघींचे नाते खूपच खास असल्याचे स्पष्ट होते. अलीकडेच ईशा देओलने तिच्या आईबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. सध्या ईशा देओल सुपरस्टार सिंगरच्या दुसऱ्या सीझनला जज करत आहे. जिथे मणी नावाच्या स्पर्धकाचा परफॉर्मन्स पाहून अभिनेत्री स्वतःला थांबवू शकली नाही.

मणीच्या आईचे त्याच्यावरील प्रेम पाहून ईशा म्हणाली, मणीची आई ज्या प्रकारे त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याला साथ देत आहे, मला आठवते की, मी लहान असताना माझी आई देखील खूप मेहनत करायची. ती नेहमी काम करत असायची जेणेकरुन ती आम्हाला सपोर्ट करील. माझी खोली तिच्या मेकअप रूमच्या समोर होती, ती तयार झाल्यावर मी तिला रोज पहायची.

जसजसे आम्ही मोठे झालो, तसतसे ती आम्हाला आमच्या अभ्यासात साथ द्यायची, आमचे आवडते पदार्थ बनवायची. नोकरी करणारी आई असण्यासोबतच तिने आम्हाला वडिलांचे प्रेमही दिले आहे. आमची स्वप्ने सत्यात उतरवण्यात तिने आम्हाला नेहमीच साथ दिली आहे.

ईशाने सांगितले की, जेव्हा ती लहान होती तेव्हा ती नेहमी तिच्या आईच्या मागे फिरायची. पण ती मोठी झाल्यावर तिच्या मैत्रिणींसोबत वेळ घालवू लागली. ईशा म्हणाली, एक काळ असा होता जेव्हा आम्ही लंडनमध्ये होतो आणि मी सर्व वेळ माझ्या मित्रांसोबत घालवत होते आणि माझी आई घरी एकटी होती. तिला वाटू लागले की तिची बिट्टू मोठी झाली आहे आणि आता तिला त्याची गरज नाही.

ईशा पुढे म्हणाली की, तिला तिच्या आईला सांगायचे आहे की असा कोणताही दिवस असू शकत नाही जेव्हा तिला तिच्या आईची गरज नसते. ईशा म्हणाली की, मला मनापासून सांगायचे आहे की माझी आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. हेमा मालिनी आणि ईशा देओल सुपरस्टार सिंगर 2मध्ये विशेष अतिथी म्हणून आल्या होत्या. धर्मेंद्रही तेथे उपस्थित होते. ‘ड्रीम गर्ल’ने येताच सर्व स्पर्धकांचे कौतुक केले.

ईशाने २००२ मध्ये ‘कोई मेरे दिल से पूछे’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी ती १८ वर्षांची होती आणि ती ग्रॅज्युएशन करत होती. यानंतर ईशाने अनेक चित्रपट केले, मात्र लग्नानंतर तिने चित्रपटांपासून अंतर ठेवले. ईशा सध्या सुपरस्टार सिंगर २ मध्ये दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-
ईशा गुप्ताने शेअर केला अंघोळ करतानाचा हॉट व्हिडीओ, लोकांनी तिच्या सुंदरतेचं केलं कौतुक
पुरूषाने बॉडी दाखवली की कोणी काही नाही म्हणत पण बाईने दाखवली तर.., ईशा गुप्ताचे मोठे वक्तव्य
ईशा गुप्ताने तोकडे कपडे घालत शुट केला आतापर्यंतचा सर्वात बोल्ड व्हिडीओ; पाहून होईल पाणी पाणी
बाबो! या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये १० अभिनेत्रींसोबत रोमान्स करणार सलमान खान, अशी असेल भूमिका

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now