मागील काही महिन्यांत बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकलेले दिसून आले. यामध्ये आता आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याचे नाव समाविष्ट झाले आहे. समोर येत असलेल्या बातम्यानुसार ‘छपाक’ फेम अभिनेता विक्रांत मेस्सीने त्याच्या गर्लफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधल्याचे (Vikrant Massey Married With Girlfriend Sheetal Thakur) सांगण्यात येत आहे.
पिंकविलाच्या माहितीनुसार, विक्रांतने त्याची गर्लफ्रेंड शीतल ठाकूरसोबत वर्सोवा येथील घरी गुपचुपपणे रजिस्टर्ड मॅरिज केला आहे. यावेळी केवळ दोघांचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र उपस्थित होते. परंतु, अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. तसेच विक्रांतनेही यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
विक्रांत आणि शीतल दीर्घकाळापासून रिलेशनशीपमध्ये होते. ‘ब्रोकन बट ब्यूटिफूल’च्या पहिल्या सीझनमध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं. यादरम्यान दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर २०१९ मध्ये विक्रांतने एक पोस्ट शेअर करत शीतलसोबत साखरपुडा केल्याची माहिती दिली होती. २०२० मध्ये ते दोघे लग्न करणार होते. पण कोरोनामुळे त्यांना लग्न पुढे ढकलावे लागले.
जून २०२० मध्ये विक्रांतने शीतलसाठी एक खास पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये त्याने लिहिले होते की, ‘या फोटोत विशेष असं काही नाही. फक्त एक व्यक्ती खास आहे जी नेहमी माझ्यासोबत असते. ही व्यक्ती माझी रॉक आहे. मला फक्त एवढंच सांगावंस वाटलं की, आयुष्यात तुमच्यासोबत काहीही होऊ द्या ऊन असो किंवा पाऊस नेहमी तुमच्या कुटुंबीयांवर आणि तुमच्या चाहत्यांवर प्रेम करत राहा आणि त्यांचे आभार मानत राहा.
विक्रांतने पुढे लिहिले की, ‘तुम्ही कसेही राहा, काहीही करा, कितीही पैसे कमवा याचा काही फरक पडत नाही. पण हे लोक नेहमी तुमच्यासोबत असणार. थोडा वेळ थांबा आणि त्यांचे आभार मानण्यासाठी थोडा वेळ द्या. या सर्वांनी तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी खूप काही केलं आहे’.
विक्रांतच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास लवकरच तो सान्या मल्होत्रासोबत ‘लव्ह हॉस्टेल’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. याशिवाय त्याच्याकडे ‘ब्लॅकआऊट’, ‘मुंबईकर’ आणि ‘गॅसलाईट’ यासारखे अनेक प्रोजेक्ट्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बॉलिवूडच्या भाईजानने लता दीदींच्या आठवणींना दिला उजाळा, गाणं म्हणत व्हिडिओ केला पोस्ट
कंगनाने सलमानची खिल्ली उडवल्यानंतर राखी सावंत भडकली, म्हणाली, ‘जिभेवर नियंत्रण ठेव’
तुला ट्रोलर्सची भिती वाटत नाही का? प्रश्नावर उर्फी जावेदने दिले जबरदस्त उत्तर, म्हणाली..