सिनेसृष्टीत सध्या अनेक सेलिब्रिटींच्या लग्नाच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. यादरम्यान आता या यादीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या (sonakshi sinha) नावाचाही समावेश होताना दिसून येत आहे. याचे कारण म्हणजे सोनाक्षीने नुकतीच तिचा साखरपुडा उरकला आहे. यासंदर्भात स्वतः सोनाक्षीने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
सोनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर ३ फोटो शेअर केले आहेत. यामध्ये पहिल्या फोटोत ती स्वतःच्या चेहऱ्यावर हात ठेवून हसताना दिसत आहे. तसेच यावेळी ती कोणाचातरी हात पकडल्याचे दिसून येत आहे. परंतु, त्या व्यक्तीचा चेहरा या फोटोत दिसत नाहिये.
त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोतही सोनाक्षी तिचा डायमंड रिंग फ्लॉन्ट करताना दिसून येत आहे. तसेच तिच्या मिस्ट्री मॅनचा संपूर्ण चेहरा दिसत नसला तरी त्याची थोडीशी झलक या फोटोत पाहायला मिळत आहे. या सर्व फोटोत सोनाक्षी खूपच खुश असल्याचे दिसून येत आहे. सोनाक्षीने हे फोटो शेअर करताच सोशल मीडियावर ते वेगाने व्हायरल झाले.
फोटो शेअर करत सोनाक्षीने लिहिले की, ‘माझ्यासाठीचा सर्वात मोठा दिवस. माझ्या सर्वात मोठ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न पूर्ण होत आहे. आणि ही गोष्ट तुमच्याशी शेअर करण्यास मी अधिक प्रतीक्षा करू शकत नाही’. सोनाक्षीची ही आनंदाची बातमी समोर येताच तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तसेच अनेकजण तिचा होणारा नवरा कोण? याबाबत तिला अनेक प्रश्न विचारत आहेत.
सोनाक्षीने तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत या फोटोंमध्ये कोणताही खुलासा केला नसला तरी मागील काही दिवसांपासून तिचे नाव अभिनेता जहीर इकबालसोबत जोडले जात आहे. जहीर इकबालने ‘नोटबुक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
जहीर आणि सोनाक्षीच्या डेटिंगची चर्चा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. परंतु. दोघांनीही कधी त्यांच्या याबाबत पुष्टी केली नाही. तर आता सोनाक्षीचा होणारा नवरा जहीर इकबालच आहे की दुसरी कोणती व्यक्ती याचा खुलासा येणाऱ्या काळातच होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
आमिर खानच्या मुलीने बिकीनीवरच साजरा आपला वाढदिवस; बोल्ड फोटो पाहून लोकं म्हणाले..
अयोध्येत लता मंगेशकर यांच्या नावाने बांधणार चौक; मुख्यमंत्री योगींनी केली मोठी घोषणा
‘लॉक अप’ विजेत्या मुनव्वर फारुकीचे ‘मिस्ट्री गर्ल’सोबतचे व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, काय चाललंय काय?