बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट (Ranbir Kapoor and Alia Bhatt) यांच्या लग्नाची सध्या माध्यमात जोरदार चर्चा सुरु आहे. समोर येत असलेल्या बातम्यांनुसार या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असून येत्या १३ किंवा १४ तारखेला दोघे विवाहबंधनात अडकणार आहेत. यादरम्यान आता लग्नाच्या तारखेत बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आलिया-रणबीरच्या लग्नाच्या तारखेबाबत गोंधळ उडाला आहे.
आजतकच्या वृत्तानुसार, आलियाचे काका रॉबिन भट्ट यांनी सांगितले होते की, १३ तारखेला आलिया आणि रणबीरचा मेहंदी सोहळा पार पडणार. त्यानंतर १४ तारखेला दोघे लग्नबेडीत अडकणार आहेत. तर आता आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट्टने या दोघांच्या लग्नाची वेगळीच तारीख सांगितली आहे. १३ आणि १४ ला आलिया-रणबीरचे लग्न होणार नसल्याचे त्याने म्हटले आहे.
राहुलने आजकतशी बोलताना म्हटले की, ‘लग्नाची तारीख सुरुवातीला १३ आणि १४ एप्रिल ठरवण्यात आली होती. मात्र, माध्यमात ही लग्नाची तारीख लीक झाल्यामुळे सुरक्षिततेसंदर्भात कारणे लक्षात घेता आता या तारखेत बदल करण्यात आली आहे’. राहुलने पुढे म्हटले की, ‘मी खात्रीपूर्वक सांगत आहे की, १३ आणि १४ ला लग्न होत नाहिये. आणि मला जेवढे माहित आहे त्यानुसार लवकरच त्यांच्या लग्नाबाबत माध्यमात घोषणा करण्यात येईल’.
रिपोर्टमध्ये पुढे सांगण्यात आले की, आलिया-रणबीरच्या लग्नाबाबत महेश भट्ट यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनीही यावर बोलण्यास नकार दिला. महेश भट्ट यांनी म्हटले की, ‘मला आमच्या व्याही (नीतू कपूर) यांच्याकडून आदेश आहेत की, मी याबाबत काहीही न बोलावे. तेव्हा मी त्यांचे म्हणणे कसे टाळू शकतो’.
दुसरीकडे रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत नीतू कपूर यांनी बोलताना म्हटले की, ‘मी तर दोन वर्षापासून त्यांच्या लग्नाच्या बातम्या माध्यमात ऐकत आहे. दररोज माध्यमात नवीन तारखा समोर येत आहेत. मी तर इथे शोमध्ये आहे. आणि काय माहित माझ्या मागे ते दोघे लग्नसुद्धा करतील. त्यामुळे जे काही होईल, ते लोकांना कळणारच आहे’.
दुसरीकडे अशाही बातम्या समोर येत आहेत की, रणबीर-आलियाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. लग्नासाठी कपूर घराण्याचे नवे घर कृष्णा राज या बंगल्यावर सजावटीचे कामही सुरु झाले आहे. त्यामुळे आता रणबीर-आलियाच्या लग्नाबाबत त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
‘या’ गोबऱ्या गालांच्या चिमुकलीला ओळखलंत का? नवाजुद्दीन सिद्दिकीसोबत पहिल्यांदाच झळकणार चित्रपटात
गालावर किस करायचा होता टास्क अन् तिने थेट केला लिपलॉक; ‘लॉकअप’मधला किसिंगचा VIDEO झाला व्हायरल
अंजलीसोबत झाला धोका, ज्याला प्रपोज केलं तो निघाला एका मुलाचा बाप; कंगनाने केली पोलखोल