प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी आणि अभिनेत्री सई मांजरेकर (mahesh manjarekar daughter saiee manjrekar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माध्यमात फारच चर्चेत आहे. सई बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही परंतु याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
रिपोर्टनुसार, असे सांगण्यात येत आहे की, सई बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता साजिद नाडियादवाला यांचा मुलगा सुभान नाडियादवाला यास डेट करत आहे. कथितरित्या त्या दोघांना नेहमी लंच आणि डिनर डेटवर जाताना पाहण्यात आले. मात्र, दोघांनी फोटोग्राफर्सना फोटो न काढण्याची विनंती केल्याने त्यांचे फोटो अद्याप समोर आले नाही.
काही दिवसांपूर्वी दोघांना एका रेस्टॉरंटमध्ये जाताना पाहण्यात आलं. यावेळी सई आणि सुभान दोघांनी वेगवेगळे फोटो काढले. पण दोघांनी एकत्र फोटो काढण्यास नकार दिला. असे सांगितले जात आहे की, सई आणि सुभान यांचे नाते आता सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्यामुळे दोघेही एकमेकांना पूर्णपणे जाणून घेऊ इच्छित आहेत. त्यानंतर ते त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करणार आहेत.
दरम्यान, हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना सईने तिच्या आणि सुभानसोबतच्या नात्यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. तिने सांगितले की, ‘आम्ही लहानपणापासून चांगले मित्र आहोत. आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो. आमच्या दोघांत डेटिंगसारखं काही नाही. आम्ही केवळ चांगले मित्र आहोत. या बातम्या खोट्या आहेत’.
पुढे तिने म्हटले की, ‘अशा बातम्या ऐकून थोडे विचित्र वाटते. आम्ही दोघे शाळेत असल्यापासून एकमेकांना ओळखतो. मात्र, तेव्हा माझ्याबाबत असे अफवा पसरवणारे कोणी नव्हते. परंतु, याबाबत मला, माझ्या मित्राला आणि माझ्या कुटुंबीयांना सत्य काय आहे हे माहित आहे. त्यामुळे मी या गोष्टींचा जास्त विचार करत नाही’.
https://www.instagram.com/p/CYTt3khNV0X/
सईच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तिने प्रभुदेवा दिग्दर्शित ‘दबंग ३’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसली होती. तर लवकरच सई अदिवी शेषसोबत ‘मेजर’ या चित्रपटात दिसणार आहे. ‘मेजर’ हा चित्रपट संदीप उन्नीकृष्णन यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकतीच काही दिवसांपूर्वी चित्रपटातील पहिल्या गाण्याचा लिरिकल सॉन्ग रिलीज करण्यात आला.
महत्त्वाच्या बातम्या :
मराठमोळी तेजस्वी प्रकाश बनली ‘बिग बॉस १५’ ची विजेती; ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रक्कम
अलिशान घराचाच नाही, तर लक्झरी कार्सचाही शौकीन आहे नवाज; वाचा किती आहे त्याची संपत्ती?
Bigg Boss 15 Finale : बिग बॉस फिनालेच्या अगोदरच लीक झाले विजेत्याचे नाव? फोटो होतोय व्हायरल