Share

सिद्धार्थ मल्होत्रानंतर आता ‘या’ अभिनेत्याला डेट करतीये कियारा अडवाणी? जाणून घ्या सत्य

Kiara Advani

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहेत. कियारा आणि सिद्धार्थचे ब्रेकअप झाले असून दोघांनी आपापला मार्ग निवडल्याची चर्चा माध्यमात जोरदार रंगत आहे. त्यांच्या या ब्रेकअपच्या बातम्यांमध्ये किती सत्यता आहे, याची अद्याप पुष्टी झाली नाही. परंतु, कियारा सध्या सिद्धार्थशिवाय दुसऱ्या एका अभिनेत्यासोबत दिसत असल्याने या चर्चांना अधिकच उधाण आले आहे.

कियारा सध्या बॉलिवूडच्या एका अभिनेत्यासोबत सातत्याने अनेक ठिकाणी दिसून येत आहे. हा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन. कियाराचे कार्तिकसोबतचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. परंतु, कियारा कार्तिकसोबत दिसण्याचे कारण सिद्धार्थसोबत ब्रेकअप झाल्यामुळे नाहीतर यामागे दुसरेच कारण आहे.

कार्तिक आणि कियारा अनेकवेळा एकत्र दिसण्याचे कारण म्हणजे लवकरच ते दोघे ‘भूल-भूलैया’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या दोघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. प्रमोशनसाठी दोघेही अनेक ठिकाणी हजेरी लावत आहेत. यादरम्यानचे त्यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, ‘भुलभुलैया’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिस बाजमी यांनी केले असून यामध्ये कार्तिक आणि कियारा मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या दोघांसोबत अभिनेत्री तब्बू, अभिनेता राजपाल यादव आणि संजय मिश्रासुद्धा या चित्रपटात दिसणार आहेत. २० मे रोजी हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.

दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास तो लवकरच ‘इंडियन पोलीस फोर्स’ या वेबसारीजमध्ये दिसणार आहे. या सीरीजमध्ये भरपूर अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. सिद्धार्थसोबत या सीरीजमध्ये विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टीसुद्धा मुख्य भूमिकेत आहेत. रोहित शेट्टी या सीरीजचे दिग्दर्शन करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या :
डिप्रेशननंतर आता ‘या’ गंभीर आजाराचा सामना करत आहे आमिर खानची मुलगी; चाहते चिंतेत
..त्यामुळे मी दाक्षिणात्य चित्रपटात काम करावे अशी त्याची इच्छा होती, जॅकलीनने ईडीसमोर दिली कबूली
सेक्स हे कॅलरीज बर्न करण्यासाठी..; आयुष्मान खुरानाच्या पत्नीने सेक्स लाईफबद्दल केला मोठा खुलासा

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now