बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल (Katrina Kaif And Vicky Kaushal) नुकतीच विवाहबंधनात अडकले. ९ डिसेंबर २०२१ रोजी राजस्थानमध्ये शाही अंदाजात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर दोघांनी ख्रिसमस आणि लोहरी (संक्रात) सण एकत्र साजरा केला. मात्र, आता असे वाटत आहे की, विकी-कतरिना लग्नानंतरचा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन (Katrina Kaif and Vicky Kaushal Valentine Day) एकत्र साजरा करणार नाहीत. कारण ते दोघे ‘व्हॅलेंटाईन डे’ ला एकत्र असणार नाहीत.
विकी-कतरिना लग्नानंतर आपापल्या कामात व्यग्र झाले आहेत. कतरिना लवकरच सलमान खानसोबत ‘टायगर ३’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत मागील महिन्यात म्हणजेच जानेवारीमध्ये करण्यात येणार होते. परंतु, कोरोनाच्या वाढत्या रूग्णांची संख्या लक्षात घेता चित्रीकरणाची योजना रद्द करण्यात आली. मात्र, आता असे सांगण्यात येत आहे की, ५ फेब्रुवारीपासून चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, ‘टायगर ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन करत असलेले दिग्दर्शक मनीष शर्मा दिल्लीत काही अॅक्शन सीन चित्रित करू इच्छित आहेत. लाल किल्ल्यासोबत दिल्ली शहरातील इतर काही ऐतिहासिक ठिकाणी हे सीन चित्रित करण्याचा दिग्दर्शकांचा विचार आहे. त्यामुळे सलमान आणि कतरिना चित्रीकरणासाठी दिल्लीत रवाना होऊ शकतात.
सलमान आणि कतरिना ५ फेब्रुवारीपासून टायगर ३ च्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहेत. तर १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान ते दोघे दिल्लीत जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अशात ‘टायगर ३’ चित्रपटाचे चित्रीकरण दिल्लीत करण्याचे निश्चित झाल्यास कतरिनाला विकीसोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करता येणार नाही. कारण ‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी ती सलमानसोबत ‘टायगर ३’ चे चित्रीकरण करत असणार, असे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे कतरिनासोबत ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यासाठी विकी कौशल दिल्लीत पोहोचण्याची शक्यतासुद्धा वर्तवण्यात येत आहे. अशात विकी-कतरिना लग्नानंतरचा त्यांचा पहिला व्हॅलेंटाईन डे एकत्र साजरा करणार आहेत की नाही, हे येणाऱ्या काळात कळेलच.
दरम्यान, विकी-कतरिनाने त्यांच्या लग्नाबाबत खूपच गुप्तपा पाळली होती. ९ डिसेंबर रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सस फोर्ट बटवारा येथे त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यांच्या लग्नाची सर्वत्र खूप चर्चा झाली. तसेच त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. लग्नानंतर विकी-कतरिना बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि क्यूट कपल्सपैकी एक झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
‘भिकार मालिका पहाव्या की नाही, हे सांगणारे विक्रम गोखले कोण?’
वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अजिंक्य देव हळहळला; म्हणाला, त्यांना खुप जगायचं होतं पण..
वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर नितेश राणेंनी अमित शहांचा फोटो असलेलं ट्विट केलं डिलीट?