बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट(Alia Bhatt) नुकतीच विवाहबंधनात अडकले आहेत. १४ एप्रिल रोजी दोघे कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली असून दोघांच्या लग्नाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. यादरम्यान त्यांच्या लग्नाचे फोटो आता एकेक करून समोर येत असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
नुकतीच अभिनेत्री करिश्मा कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर रणबीर आणि आलियाच्या लग्नसोहळ्यादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका फोटोत करिश्माच्या हातात कलीरा पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती खूपच उत्साहित आणि खूश दिसत आहे. या फोटोमुळे आता करिश्मा कपूर दुसऱ्यांदा लग्न करणार की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
त्याचे असे आहे की, पंजाबी लग्नांमध्ये एक परंपरा असते. यामध्ये नववधू कलीरा अविवाहित मुलींच्या डोक्यावर पाडत असते. ज्या मुलीच्या डोक्यावर हा कलीरा पडेल त्या व्यक्तीच्या आयुष्यात लवकरच विवाह योग असल्याचे समजले जाते. तर रणबीर-आलियाच्या लग्नात आलियाचा कलीरा करिश्मावर येऊन पडला.
कलीरा तिच्यावर पडल्यामुळे करिश्मा खूपच खूश झाल्याचे तिने शेअर केलेल्या फोटोत दिसून येत आहे. तसेच तिच्या आजूबाजूला करण जोहर, रिद्धीमा कपूर असे अनेक सेलिब्रिटी दिसून येत आहेत. तसेच सर्वजण या फोटोत खूपच खूश असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे आलियाची मैत्रीण आकांक्षा रंजन कपूर कलीरा तिच्यावर न पडल्याने नाराज झाल्याचे या फोटोवरून लक्षात येत आहे.
फोटो शेअर करत करिश्माने लिहिले की, ‘इन्स्टाग्राम Vs वास्तव. कलीरा माझ्यावर पडला मित्रांनो’. करिश्माने ही पोस्ट शेअर करताच त्यावर अनेक सेलिब्रिटी आणि चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरुवात केली. तिच्या या पोस्टवर मनीष मल्होत्रा, रिद्धीमा कपूर, आदर जैन, अमी पटेल यांसोबत अनेक चाहत्यांनी कमेंट केले आहे. तर आता करिश्मावर कलीरा पडल्याने ती आता दुसऱ्यांदा लग्न करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, करिश्माने बिजनेसमॅन संजय कपूरसोबत लग्न केले होते. परंतु, २०१६ साली ती पतीपासून वेगळी झाली. संजय कपूरपासून करिश्माला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. कियान आणि समायरा अशी करिश्माच्या मुलांची नावे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
आलिया-रणबीरच्या मेहंदीच्या वेळी करण जोहरसोबत घडला होता मजेशीर प्रकार, वाचून पोट धरून हसाल
लहाणपणी उपाशी झोपायचा, बहिणीच्या मृत्युनंतर झाला होता शांत, विजयची कहाणी वाचून व्हाल भावूक
विराट कोहलीचा सुपरमॅन कॅच पाहून अनुष्का शर्माने दिली ‘अशी’ रिऍक्शन, व्हिडीओ व्हायरल