Share

“रात्री मोठ्याने गाणी लावत रस्त्यावर गाड्यांचे स्टंट करणं हे छत्रपतींचे विचार आहेत का?”

सध्या सातारा नगरपालिका निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे, त्याप्रमाणे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप प्रत्यारोप वाढत आहेत. सातारमधील राजकारण चांगलंच तापलं आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात निवडणुकीच्या निमित्ताने आरोप -प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे.

नुकेतीच उदयनराजेंनी साताऱ्यातील एक सोसायटी ताब्यात घेतली. दरम्यान, विजयी उमेदवारांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर सडकून टीका केली होती. आता त्यांच्या या टीकेला शिवेंद्रराजेंनी त्यांच्या भाषेत उत्तर दिले आहे.

उदयनराजे साताऱ्यात अनेकदा रात्री मोठमोठ्याने गाणी लावून गाडीचे स्टंट करताना दिसतात. यावर शिवेंद्रराजे यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, उदयनराजे साताऱ्यात रात्री मोठ्याने गाणी लावून गाडीचे स्टंट करतात हे त्यांचे डोंबारी खेळ म्हणावेत का? त्यांचा हा खेळ त्यांच्या वाढदिवसाला सातारकरांनी बघितला आहे.

तसेच म्हणाले, उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने चालणारे आहेत तर मग त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला? मी कसा काय विधानसभेत निवडून आलो? आपण छत्रपतींच्या विचारांचे आहोत आणि मी नाही असं सांगणाऱ्या उदयनराजेंनी याचं उत्तर द्यावं, असे शिवेंद्रराजे म्हणाले.

छत्रपतींचा विचार म्हणजे रात्री गाड्या फिरवायच्या, मोठमोठ्याने गाणी लावायची असं आहे का? यात्रेत आपण डोंबाऱ्यांचे खेळ पाहतो, परवा सातारकरांनी उद्यानराजेच्या वाढदिवसाला हा डोंबाऱ्याचा खेळ पाहिला. आपण राज्यसभेतील खासदार आहोत, आणि काय करत आहोत याचं भान ठेवलं पाहिजे.

कारखान्यात होत असणाऱ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलताना म्हणाले की, कारखान्यातील सभासदांनी, ऊस घालणाऱ्यांनी त्यावर बोलणं योग्य राहील. उदयनराजे कारखान्याचे सभासद नाहीत. त्यांनी शेती तर कधीच केली नाही. कोणतीही निवडणूक असली की कारखान्यावर ते आरोप करतात, अजिंक्यतारा कारखाना 10 व्या दिवसाला पैसे जमा करतो हा काय भ्रष्टाचार आहे का? उदयनराजे यांची बुद्धी भ्रष्ट होतीये का? असा त्यांनी यावेळी टोला लगावला.

राजकारण

Join WhatsApp

Join Now