Share

BIGG BOSS 15: गौहर खानच्या मते ‘हा’ व्यक्ती आहे विजेता, तेजस्वी प्रकाश जिंकल्यानंतर गौहर खान नाखूश?

Gauahar Khan Unhappy With Tejasswi Prakash

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १५’ चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या सीझनमध्ये तेजस्वी प्रकाशने विजेतेपद मिळवत बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. त्यामुळे तिच्या चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटींकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यादरम्यान अभिनेत्री आणि माजी ‘बिग बॉस’ शोची विजेती गौहर खानने मात्र तेजस्वी प्रकाशवर निशाणा साधला (Gauahar Khan Unhappy With Tejasswi Prakash)आहे.

तेजस्वी प्रकाश बिग बॉसचे विजेतेपद मिळवल्यानंतर गौहर खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने कोणाच्याही नावाचा उल्लेख न करता बिग बॉसच्या विजेत्यावर निशाणा साधला आहे. तिने ट्विट करत लिहिले की, ‘LoL.. घोषणेच्या वेळी स्टुडिओतील शांततेनेच सर्वकाही सांगितले. ‘बिग बॉस १५ चा केवळ एकच विजेता आहे आणि जगाने त्याला चमकताना पाहिले आहे’.

तिने पुढे लिहिले की, ‘प्रतीक सहजपाल तू सर्वांची मने जिंकलास. घरात गेलेल्या प्रत्येक सदस्याचा तु आवडता आहेस. जनता तुझ्यावर खूप प्रेम करते. तुझा मान नेहमी उंच ठेव’. दरम्यान, गौहरच्या या पोस्टद्वारे लक्षात येत आहे की, तिच्या नजरेत प्रतीक सहजपालच शोचा विजेता आहे. आणि तेजस्वीच्या विजयावर ती नाखूश आहे.

‘बिग बॉस’च्या १५ व्या सीझनमध्ये करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल, नितीश भट्ट आणि शमिता शेट्टी हे स्पर्धक टॉप ५ मध्ये पोहोचले होते. यामध्ये नीतीश भट्ट १० लाख रूपये घेऊन विजेता स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर शमिता शेट्टी स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर करण कुंद्रा, तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल टॉप ३ मध्ये पोहोचले. त्यानंतर सलमान खानने टॉप २ विजेत्यांची नावे सांगितली.

टॉप २ मध्ये तेजस्वी प्रकाश आणि प्रतीक सहजपाल पोहोचले होते. यावेळी सर्वांनाच वाटले होते की, प्रतीक शोचा विजेता होणार. तसेच सोशल मीडियावरही ‘बिग बॉस १५’ व्या सीझनचा विजेता प्रतीकच होणार असा दावा करण्यात येत होता. मात्र, अखेर सलमान खानने तेजस्वी प्रकाशला विजयी घोषित केले. त्यामुळे काही क्षणांसाठी सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता.

दरम्यान, यावेळी तेजस्वी प्रकाशला विजेता घोषित केल्यानंतर तिला बिग बॉस शोच्या ट्रॉफीसोबत ४० लाख रूपयेही देण्यात आले. याशिवाय तिला ‘नागिन ६’ या शोमध्ये मुख्य भूमिकेची ऑफरही देण्यात आली. तेजस्वीच्या या विजयानंतर तिच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
रानू मंडल पुन्हा आली भेटीला, गायलं कच्चा बादाम गाणं; सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडिओ
सलमान अफजल तर मी छत्रपती शिवाजी महाराज, कोथळा बाहेर काढेन; बिचुकलेचे वादग्रस्त वक्तव्य
बिचुकलेने सलमानला दिली आता थेट धमकी; म्हणाला, सलमान अफजल खान तर मी..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now