दाक्षिणात्य अभिनेता धनुष मागील काही दिवसांपासून माध्यमात फारच चर्चेत आहे. धनुषने पत्नी ऐश्वर्यासोबत वेगळे होत असल्याची सोशल मीडियाद्वारे घोषणा केली होती. त्यानंतर त्याच्या आणि ऐश्वर्याबाबत अनेक बातम्या माध्यमात समोर आल्या. यादरम्यान आता धनुषबाबत आणखी एक बातमी समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की, धनुष आणि ऐश्वर्याचं नातं टिकवण्यासाठी रजनीकांत प्रयत्न करत आहेत. परंतु, धनुष मात्र रजनीकांत यांना भेटणं टाळत आहे.
समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, रजनीकांत त्यांची मुलगी ऐश्वर्याचा संसार टिकवण्यासाठी धनुषला भेटून त्याच्याशी बोलण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, धनुष रजनीकांत यांना जाणीवपूर्वक टाळत आहे. आपल्या सासऱ्यांना काय सांगायचं आणि त्यांना नाही कसं म्हणायचं, या विचारात असल्याने धनुष त्यांना भेटणं टाळत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
धनुष हा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते कस्तूरी राजा यांचा मुलगा आहे. तर ऐश्वर्या सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी. दोघे २००४ साली विवाहबंधनात अडकले होते. त्यांना यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलेही आहेत. मात्र, १८ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
यासंदर्भात सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत दोघांनी त्यांच्या विभक्त होण्याची घोषणा केली. ट्विटमध्ये त्यांनी लिहिले होते की, ‘अनेक वर्षे एकत्र मित्र म्हणून, जोडपे म्हणून आणि आई-वडील म्हणून, एकमेकांचे शुभचिंतक म्हणून प्रवास केला, एकमेकांना समजून घेतलं, अॅडॉप्ट केलं. आज आम्ही जिथे उभे आहोत तिथून आमचे रस्ते वेगळे होत आहेत’.
‘ऐश्वर्या आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे, आम्हाला समजायला वेळ लागला की आम्ही वेगवेगळेच ठीक आहोत. आमच्या निर्णयाचा आदर करा आणि तो हाताळताना आम्हाला प्रायवसी द्या’. अशी विनंतीही त्यांनी पोस्टमध्ये केली.
🙏🙏🙏🙏🙏 pic.twitter.com/hAPu2aPp4n
— Dhanush (@dhanushkraja) January 17, 2022
दरम्यान, धनुषचे वडिल कस्तुरी राजा यांनी नुकतीच एका मुलाखतीत बोलताना ऐश्वर्या-धनुषच्या विभक्त होण्यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले धनुष-ऐश्वर्याचे घटस्फोट नाही तर ते केवळ कौटुंबिक वाद आहे. याशिवाय काही रिपोर्टसमध्ये सांगण्यात येत आहे की, धनुष आणि ऐश्वर्या कायदेशीररित्या वेगळे होणार नाहीत. तसेच आपल्या मुलांचा सांभाळ करण्याकरिता ते दोघे सोबतच असतील, असेही सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
गोविंदाच्या ‘त्या’ वाईट सवयीला कंटाळून संजय दत्तने सरळ अंडरवर्ल्ड डॉनकडे केली होती तक्रार
डुग्गूचे अपहरण कोणी केले? पुणे पोलिसांनी लावला छडा
‘आई कुठे काय करते?’ फेम मधुराणी गोखलेंनी सांगितले वैयक्तिक आयुष्यातील सत्य, अरुंधतीप्रमाणे माझ्याही आयुष्यात…