Share

अशोक चव्हाणांचा भाजपमध्ये प्रवेश झाला निश्चीत? राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली मोठी अपडेट

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्याच्या चर्चेवर प्रश्न विचारण्यात आला, यावेळी उत्तर देताना त्यांनी केलेल्या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. तसेच त्यांनी यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा देखील समाचार घेतला.

नुकतेच विधान भवनासमोरील प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नोंदणी व मुद्रांक भवनाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्रकारांनी अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल प्रश्न केले.

यावर राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण व माझा काही संपर्क नाही. सध्या काँग्रेसचे कोणीही माझ्या संपर्कात नाही. मात्र काँग्रेस पक्षात अस्वस्थता असल्याच्या बातम्या मला मिळत आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

तसेच म्हणाले, भाजप हा काही खूप वेगळा पक्ष नाही. हा जनाधार असलेला पक्ष आहे. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. एवढी मोठी मान्यता जनतेने दिली आहे. मोदींचे जगात मान्य आहे. त्यामुळे मोदींचे नेतृत्त्व स्वीकारायला काही हरकत नाही. काँग्रेसकडे नेतृत्त्व नाही. दिशा नाही. काँग्रेसची दशा झाली आहे.

पुढे म्हणाले, पक्षात कोणाला घ्यायचे, कोणाला नाही हा पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, त्यावर ते ठरवतील. मात्र, जर अशोक चव्हाण भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचं स्वागत आहे, असे विखे पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला.

म्हणाले, नाना पटोलेंकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे तेच जुने आरोप ते करतात. नाना पटोले हे माझे मित्र आहेत. ते भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले, त्यावेळी त्यांना कोणाचा फोन होता? देशभरात काँग्रेसची जी दुरवस्था झाली आहे ती कशामुळे झाली याचे आत्मचिंतन व्हायला हवे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now