मागील काही दिवसांपासून देशामध्ये सामाजिक सलोखा आणि शांतता भंग करणाऱ्या काही घटना घडताना आढळून येत आहेत. राजस्थानमधील उदयपूरमध्ये घडलेल्या कन्हैयालाल हत्या प्रकरणाने सर्वत्र एकच खळबळ माजली. या हत्या प्रकरणाचा निषेध देशातील सामान्यांपासून ते प्रसिद्ध कलाकार, राजकारणी, क्रिकेटर सर्वांकडून केला जात आहे. फेमस क्रिकेटर इरफान पठाण यानेही ट्विट करत याघटनेबाबत निषेध व्यक्त केला आहे. (Irfan Pathan is angry after the murder of Nupur Sharma’s supporter)
इरफान पठाणने ट्विट करत म्हंटले आहे की, ‘एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवाला हानी पोहोचवणं म्हणजे मानवतेला दुखापत करणं होय’. या शब्दात इरफान पठाणने आपला संतापच एका प्रकारे व्यक्त केला आहे.
इरफान पठाणने ट्विटर करत कन्हैयालाल हत्याकांड खूप दुर्दैवी असल्याचे म्हंटले आहे. ‘तुम्ही कोणत्या धर्मावर विश्वास ठेवता हे महत्वाचे नाही. एखाद्या निष्पाप व्यक्तीच्या जीवाला हानी पोहोचवणं म्हणजे मानवतेला दुखापत करणं होय’, अशी संतप्त प्रतिक्रिया इरफान पठाणने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
या प्रकरणाच्या अधिक माहितीनुसार, निषेध राजस्थानच्या उदयपूर येथे राहणाऱ्या कन्हैयालाल या व्यक्तीची काही समाजकंठकांनी हत्या केली. मरण पावलेल्या व्यक्तीच्या ८ वर्षीय लहान मुलाने नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकली होती. यामुळे संतप्त झालेल्या काही व्यक्तींनी कन्हैयालालच्या दुकानात घुसून त्याची हत्या केली.
या धक्कादायक घटनेनंतर पूर्ण राज्यात १४४ कलम लागू करण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केली आहे. कन्हैयालालची हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींनी एका व्हिडीओच्या माध्यमातून हत्येची कबुली दिली आहे.
कायदा आणि सुव्यवस्था राजस्थानमध्ये राखण्यासाठी पोलीस प्रशासन सर्व खबरदारी या ठिकाणी घेताना दिसते. पोलिसांकडून कडक बंदोबस्त राखण्यात आला आहे. राज्यभरात जमावबंदी त्यांनी लागू केली आहे. या घटनेचे पडसाद देशभरात उमटताना दिसत आहेत. या हत्येचा निषेध सर्वच स्तरांतून केला जात असून इरफान पठाणनेही आपला निषेध ट्विटरद्वारे नोंदवला आहे.
महत्वाच्या बातम्या-
काशी विश्वनाथ मंदीरातून साईबाबांच्या मुर्त्या हटवा, महंतांचा आदेश; वाचा नेमकं काय घडलं..
राणादासाठी पाठकबाईंनी घेतला खास उखाणा; म्हणाली, फुलावर फिरत असतो भुंगा…
राज्यपालांनी ‘मविआ’ला चहुबाजूंनी घेरलं! बहुमत चाचणीसाठी घातल्या ‘या’ कठोर अटी