irfan pathan anrgy on rohit sharma टी २० वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडकडून झालेल्या पराभवानंतर भारतीय संघाचा माजी खेळाडू इरफान पठाण खूपच निराश दिसत होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ६ विकेट्स गमावून १६८ धावा केल्या. त्यानंतर इंग्लंडने दमदार फलंदाजी करत हा सामना १० विकेट्ने जिंकला.
यात मोठी बाब म्हणजे भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली नाही. त्यामुळे टीम इंडियाला १० विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात भारताकडून इंग्लंडविरुद्ध अत्यंत साधी गोलंदाजी पाहायला मिळाली. कारण भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीपकडून जी गती हवी होती ती नो पॉवर प्लेमध्ये मिळाली नाही.
त्यामुळे इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यामुळे इंग्लंडने हा सामना एकही विकेट न गमावता सहज जिंकला. या सामन्यात खराब गोलंदाजीमुळे माजी खेळाडू इरफान पठाणही चांगलाच संतापलेला दिसला.
इरफान पठाणने गोलंदाजांची चांगलीच शाळा घेतली आहे. लेगस्पिनर गोलंदाज युजवेंद्र चहलचा या सामन्यात समावेश करायला हवा होता, असे त्याने म्हटले आहे. तसेच पुढे तो म्हणाला की, फाटलेल्या ढोलप्रमाणे सांगत होतो चहलला खेळू द्या. कारण ते मैदान फिरकीपटूंसाठी आहे. चांगला फिरकीपटू संघात असेल तर भारताला विकेट्स घेता आल्या असत्या.
इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर आज करोडो भारतीय चाहत्यांची ह्रदये तुटली, कारण १५ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगले. या सामन्यात भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी धडपडताना दिसले. पण याचे सर्व श्रेय इंग्लंडच्या फलंदाजांना जाते. ज्यांनी एकही विकेट पडू दिली नाही.
दुसरीकडे, या सामन्यातील भारतीय खेळाडूंबद्दल बोलायचे झाले एकाही गोलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही. भुवनेश्वरने २ षटकात २५ धावा दिल्या. मोहम्मद शमीने ३ षटकात ३९ धावा दिल्या. यामध्ये अश्विन सर्वात महागडा ठरला, त्याने १३.५० इकॉनॉमी रेटने २ षटकात एकही विकेट न घेता २७ धावा दिल्या.
महत्वाच्या बातम्या-
शामी-भुवीच्या निष्काळजीपणावर संतापला रोहित; चालू मॅचमध्येच झाप झाप झापले, व्हिडीओ व्हायरल
इंग्लंडकडून लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर ढसाढसा रडला रोहीत शर्मा; व्हिडीओ पाहून भावूक व्हाल
india : वर्ल्डकपचे स्वप्न भंगले; इंग्लंडने एकही गडी न गमावता केला भारताचा दारूण पराभव