यंदाचे आयपीएल सामने हे खुपच रोमांचक होत आहे. पण यंदा चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सला मात्र पराभवांचा सामना करावा लागत आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना पार पडला. या सामन्यात मुंबईला पराभवाला सामोरे जावे लागले. बेंगलोरने ७ विकेटने हा सामना जिंकला आहे. (irfan pathan angry on rohit sharma)
या सामन्यात सूर्यकुमारला सोडून इतर कोणत्या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. तसेच यंदा मुंबई इंडियन्सच्या कोणत्याच खेळाडूची कामगिरी इतकी खास राहिलेली नाही. आता आयपीएलमध्ये सातत्याने सामने गमावणाऱ्या मुंबई इंडियन्सवर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने संताप व्यक्त केला आहे. जसप्रीत बुमराहला पाठिंबा न दिल्याबद्दल त्याने उर्वरित खेळाडूंवर टीका केली.
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणचा विश्वास आहे की, मुंबई इंडियन्स अजूनही आयपीएल २०२२ मध्ये पुनरागमन करण्यास सक्षम आहेत. परंतु जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त दर्जेदार वेगवान गोलंदाज नसल्यामुळे पाच वेळा विजेतेपद मिळवूनही यंदा त्यांना एकही सामना जिंकता आलेला नाही.
इरफान पठाण म्हणाला की, अशा परिस्थितीतून कसे परत यायचे हे मुंबई इंडियन्सला माहीत आहे. त्यांनी यापूर्वी २०१४ आणि २०१५ मध्ये असे केले आहे. आयपीएल २०१५ मध्ये, ते सारख्याच स्थितीत होते आणि जेतेपद जिंकण्यासाठी मागून आले होते, परंतु तो संघ थोडा वेगळा होता. यंदा मुंबईकडे जसप्रीत बुमराहला चांगली साथ देऊ शकेल असा गोलंदाज नाही आणि बुमराह एकटा काहीच करु शकत नाही. त्यामुळे त्याला साथ देणारा गोलंदाज आणा.
तिलक वर्माने तीन सामन्यांत ६०.५० च्या सरासरीने आणि १६१.३३ च्या स्ट्राईक रेटने १२१ धावा केल्या आहेत. युवा डावखुरा फलंदाज ऑरेंज कॅप यादीत सातव्या क्रमांकावर आहे. आयपीएल सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसणाऱ्या तिलक वर्मावरचेही इरफान पठाण कौतूक केले आहे.
तो म्हणाला, मुंबईची फलंदाजी अजूनही चांगली दिसते कारण त्यांच्याकडे तरुण तिलक वर्मा चांगली कामगिरी करत आहेत. सूर्यकुमार यादव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहेत आणि इशान किशन पण जबरदस्त फलंदाजी करत आहेत. आशा आहे की रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्ड ही स्पर्धा पुढे जात असताना धावा करतील. पण त्यांना त्यांच्या गोलंदाजांवर लक्ष देणं गरजेचं आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादवचे त्याच्या परतीच्या सामन्यात अर्धशतक झळकावल्याबद्दल त्याचे कौतुक केले. त्यानंतर आरसीबी विरुद्धच्या सामन्यातही सूर्यकुमार यादवने दमदार कामगिरी केली आहे. त्याने नाबाद ३७ चेंडूत ६८ धावा ठोकल्या आहे.
महत्वाच्या बातम्या-
आदित्य ठाकरेंनी काकविरोधात उघडपणे थोपटले दंड, म्हणाले ‘मी स्टंटबाजीला…’
शिवसेना भवनासमोर मनसेने लावली हनुमान चालिसा; भोंगे जप्त केल्यावर मनसे आक्रमक
ठाण्याची उत्तर सभा ठरणार वादळी, ‘या’ तीन नेत्यांवर गरजणार राज ठाकरे; टीझरही आला समोर