Yusuf Pathan Birthday: भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युसूफ पठाण आज (गुरुवार) 40 वर्षांचा झाला आहे. हा उजव्या हाताचा खेळाडू देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्याने फलंदाजी करताना अनेक धडाकेबाज खेळी करून मोठे यश संपादन केले. यासह त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आघाडीच्या फलंदाजांना बाद करून संघासाठी महत्त्वपूर्ण विकेट मिळवल्या.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) युसूफ पठाणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्याचा धाकटा भाऊ आणि स्टार अष्टपैलू इरफान पठाणसोबतचा दोघांचा बालपणीचा फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये पठाण ब्रदर्स क्रिकेटच्या जर्सीत मैदानावर बॉल हातात धरून उभे आहेत. त्याचे हे छायाचित्र क्रिकेट चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
युसूफ पठाण यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९८२ रोजी गुजरातमधील वडोदरा येथे एका गुजराती पठाण कुटुंबात झाला. त्याने 2001 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आणि सप्टेंबर 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या T20 वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात सामील झाल्यानंतर 2007 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने अंतिम सामन्यात भारतासाठी डावाची सुरुवात केली आणि 15 धावा केल्या. युसूफ पठाणने फेब्रुवारी २०२१ मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
I Love you then! I love you now! I will love you forever! @iamyusufpathan #brothers #friends pic.twitter.com/BvxCt6vcba
— Irfan Pathan (@IrfanPathan) November 17, 2022
युसुफ 10 जून 2008 रोजी ढाका येथे पाकिस्तानविरुद्ध भारतासाठी पहिला वनडे खेळला. तो 18 मार्च 2012 रोजी ढाका येथे पाकिस्तानविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. पठाणने भारतासाठी फक्त एकच कसोटी खेळली असली तरी टी-२० क्रिकेटमध्ये त्याने एक स्पेशालिस्ट म्हणून स्वत:चे एक स्थान निर्माण केले आहे.
धाकटा भाऊ इरफान पठाण याचीही क्रिकेट कारकीर्द चमकदार होती. इरफानने 29 कसोटी, 120 एकदिवसीय आणि 24 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. दरम्यान, त्याने कसोटीत 100, एकदिवसीय सामन्यात 173 आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 23 बळी घेतले. या स्टार अष्टपैलू खेळाडूने अनुक्रमे 1105, 1544 आणि 172 धावाही केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
टेनिस बॉल क्रिकेट खेळून टिम इंडीयाचा स्टार बनलाय हा क्रिकेटर, वर्ल्डकपमध्ये घालतोय धुमाकूळ
अर्जून तेंडूलकरने लगावले ७ षटकार; नंतर घातक गोलंदाजीच्या जोरावर एकहाती जिंकवला सामना
Sachin tendulkar : आपल्या मुलाचं टीम इंडियात सिलेक्शन व्हावं म्हणून सचिन तेंडुलकरने या देवाला घातलं साकडं