Share

शेतात काम केलं, लोकांची खरकटी भांडी धुतली, आज UPSC मध्ये २१७ रँक मिळवत झाली IPS

UPSC, Ilma Afroz, Uttar Pradesh, Congharsh/ उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील कुंडरकी या छोट्याशा गावात राहणाऱ्या इल्मा अफरोजने (Ilma Afroz) लहानपणापासूनच आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. वडिलांचे निधन झाले तेव्हा ती केवळ 14 वर्षांची होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आणि शेतीची संपूर्ण जबाबदारी तिच्या आईच्या खांद्यावर आली. त्यानंतर इल्मा अफरोजनेही अभ्यासासोबतच आईला शेतात मदत करायला सुरुवात केली.

मुरादाबाद येथून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर इल्मा अफरोजने सेंट स्टीफन्स, दिल्ली येथे प्रवेश घेतला. तेथून तिने तत्त्वज्ञानात पदवीचे शिक्षण घेतले. इल्मा सेंट स्टीफनमध्ये घालवलेल्या वर्षांना तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ मानते, जिथे तिला खूप काही शिकायला मिळाले. तिच्या मेहनतीमुळे तिला ऑक्सफर्ड विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली आणि तेथून तिने पदव्युत्तर शिक्षण घेतले.

त्यावेळी परदेशात जाण्यासाठी इल्माकडे तिकीटाचे पैसे नव्हते, मग गावातील चौधरी दादांची मदत घेतली. तिला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत शिष्यवृत्ती मिळाली, पण बाकीच्या खर्चासाठी ती शिकवणी शिकवायची आणि मुलांची काळजी घ्यायची. दरम्यान, तिच्या आईला गावकरी सांगू लागले की, ती आता परदेशात राहणार आहे आणि भारतात परत येणार नाही.

पदवीनंतर, इल्मा अफरोज एका स्वयंसेवक कार्यक्रमात सामील होण्यासाठी न्यूयॉर्कला गेली. तिथे तिला फायनान्शिअल इस्टेट कंपनीत उत्तम नोकरीची ऑफर मिळाली. पण ती आपले शिक्षण हा आपल्या आईचा आणि देशाचा हक्क मानते. त्यामुळेच भारतात आल्यानंतर तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. 2017 मध्ये, इल्माने नागरी सेवा परीक्षेत 217 वा क्रमांक मिळवला होता. तेव्हा तिचे वय 26 वर्षे होते. सध्या ती शिमल्यात एसपी एसडीआरएफ म्हणून तैनात आहेत.

जमिनीशी जोडलेले राहणे किती महत्त्वाचे आहे हे इल्माची कथा सांगते. जमिनीशी जोडलेले रहा आणि आपल्या ध्येयावर लक्ष्य केंद्रित करा. इल्माने आपले यश कधीही डोक्यावर जाऊ दिले नाही. तसेच या यशाच्या वाटेवर भेटलेल्या लोकांचे सहकार्यही ती विसरली नाही. उलट या संघर्षात तिचे सोबती बनलेल्या प्रत्येकाचे आभार मानले आणि संधी आल्यावर योगदान देण्यापासून कधीही मागे हटले नाही.

महत्वाच्या बातम्या-
वडिलांनी दिलेल्या ‘त्या’ एका सल्ल्यामुळे बदलले मुलीचे आयुष्य, UPSC पास करत थेट झाली IPS
बाप बाप असतो! मुलगी UPSC मध्ये उत्तीर्ण व्हावी म्हणून रिक्षा चालवताना करतो अभ्यास
यूपीएससी टॉपर टीना डाबी अडकली विवाहबंधनात, बाबासाहेबांचा फोटो पाहून सर्वांनी केले कौतुक

ताज्या बातम्या शिक्षण

Join WhatsApp

Join Now