Share

IPL चे पाकिस्तान कनेक्शन झाले उघड, सट्टेबाजांवर BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०१९ मधील मॅच फिक्सिंग आणि सट्टेबाजी संदर्भात केंद्रीय तपास संस्थेने (CBI) मोठी कारवाई केली आहे. शनिवारी, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) ने पाकिस्तानशी निगडीत फिक्सिंग नेटवर्कचा पर्दाफाश करत दोन FIR दाखल केल्या आहेत. हे एफआयआर गुन्हेगारी कट, फसवणूक, आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत नोंदवण्यात आले आहेत.(IPL’s Pakistan connection revealed)

सीबीआयने एफआयआरमध्ये म्हटले आहे की, “पाकिस्तानकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे, इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्यांच्या निकालावर क्रिकेट सट्टेबाजीच्या नेटवर्कबद्दल विश्वासार्ह माहिती प्राप्त झाली आहे.” आयपीएल सामन्यांशी संबंधित सट्टेबाजीच्या नावाखाली ते सामान्य लोकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत होते.

पुढे लिहिले आहे की, यासाठी त्यांनी बनावट ओळखपत्र वापरून बँक खाती उघडली. ही बँक खाती जन्मतारीख सारख्या बोगस तपशिलांसह आहे. तसेच बँक अधिकाऱ्यांनी योग्य तपासणी न करता ती उघडली आहेत. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, आरोपी वकास मलिक नावाच्या पाकिस्तानी नागरिकाच्या संपर्कात होते, ज्याचा नंबर प्राथमिक तपासादरम्यान आधीच प्राप्त झाला आहे.

एजन्सीच्या पहिल्या एफआयआरमध्ये दिलीप कुमार (दिल्ली), गुर्राम सतीश आणि गुर्राम वासू (दोघेही हैदराबाद) अशी तीन व्यक्तींची नावे आहेत. ज्यांचे नेटवर्क २०१३ पासून बेटिंगमध्ये (सट्टेबाजी) गुंतलेले आहे. आरोपींच्या खात्यात सुमारे १० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.

शुक्रवारी नोंदवलेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये केंद्रीय एजन्सीने सज्जन सिंग, प्रभू लाल मीना, राम अवतार आणि अमित कुमार शर्मा यांची नावे घेतली आहेत. हे चौघे राजस्थानचे आहेत. दुसऱ्या एफआयआरमध्ये, २०१० पासून आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीमध्ये सक्रिय असलेल्या एका अज्ञात सरकारी अधिकारी आणि इतर खाजगी व्यक्तींची नावे आहेत.

महत्वाच्या बातम्या-
नव्या डिव्हिलियर्स चा आयपीएलमध्ये दबदबा; लोक म्हणाले, हा कॉमेंटेटर भारताला वर्ल्डकप जिंकून देणार
IPL 2022: आशिष नेहराचे लज्जास्पद कृत्य कॅमेऱ्यात कैद; आयपीएलच्या नियमांचे उल्लंघन
आई-बहिणीला गरिबी हटवण्याचे दिले होते वचन, आता बनला आहे आयपीएलचा नवा सिक्सर किंग
झाडू मारण्याचे काम सोडून बनला क्रिकेटपटू; आज आयपीएलमध्ये घालत आहे धुमाकूळ 

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now