Share

मनसेच्या निशाण्यावर IPL! बस फोडत दिला पहीला दणका; जाणून घ्या यामागील कारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयपीएलला पहिला दणका दिला आहे. वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंच्या प्रवासासाठी या वॉल्वोच्या बसेस वापरल्या जात होती. एक बस ताज हॉटेलबाहेर उभी होती त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी बसवर हल्ला चढवला आणि तिची तोडफोड केली.(IPL on MNS target! The first blow to the bus;)

यावेळी त्यांनी बसवर पोस्टरही चिटकवला ज्यावर मनसेचा दणका असे लिहीले होते. या प्रकरणी पोलिसांनी तीन मनसेच्या कार्यकर्त्यांना अटक केली आहे. बस फोडण्यामागे कारण असे होते की आयपीएल वाहतूक व्यवस्थापनेचे काम मुंबईमधील स्थानिक व्यावसायिकांना न दिल्याने मनसेला राग अनावर झाला होता. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली.

आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या सोयीसाठी बस महाराष्ट्राच्या बाहेरून मागवल्या आहेत पण राज्यातील बस वाहतूकदारांना काम दिलेले नाही. यामुळे मनसेचे कार्यकर्ते संतापले आहेत. स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम दिले जावे अशी मनसेची मागणी आहे.

संजय नाईक म्हणाले की, “हे प्रकरण गेल्या आठवड्याभरापासून हाताळत आहे. मी आयपीएलशी संबंधित अधिकारी, राज्यातील मंत्री आणि संबंधित सर्व वाहतूक ठेकेदरांना प्रत्यक्ष भेटून, निवेदन देत, फेसबुकवरुन विनंतीही केली होती. संजय नाईक मनसेचे वाहतूक सेना अध्यक्ष आहेत.

आदित्य ठाकरे यांनी आयपीएलमुळे वाहतूक वाढेल, हॉटेल उद्योग त्याचसोबत वाहतूक क्षेत्र वाढेल, असे सांगितले होते. पण आयपीएलचे वाहतुकीचे काम सर्व दिल्लीतील कंपन्यांना दिले आहे. महाराष्ट्रातही तेवढे सक्षम वाहतुकदार आहेत पण त्यांना काम देण्यात आलेले नाही. टेम्पोदेखील दिल्लीतूनच आणले जात आहेत. आयपीएलच्या आयोजनाची बैठक झाली यावेळी आदित्य ठाकरे बोलत होते.

कित्येकदा सांगूनही अधिकाऱ्यांनी काही ऐकले नाही म्हणून मनसेने तोडफोड केली. पदाधिकाऱ्यांनीही यावर उत्तर दिले आहेत. ते म्हणाले की, दिल्लीच्या गाड्यांवर कोणताही कर नाही. त्यांना कोणताही कर भरावा लागत नसल्याने ते कमी टेंडर भरत आहेत. पण महाराष्ट्रातील लोकांना या सर्व गोष्टींचा विचार करावा लागत आहे.

आधीच लॉकडाउनमुळे पिचले असताना उद्योगधंदा नाही. पण तरीही मुद्दामून असं केलं म्हणणं योग्य नाही,” असंही ते म्हणाले. ‘आयपीएल’ला २६ मार्चपासून सुरू होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये होणार आहे. प्रेक्षक यासाठी उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या
आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची भरमैदानात गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडविणारा व्हिडीओ आला समोर
काँग्रेसला मोठा धक्का! विधानसभा निवडणूकांच्या पराभवानंतर चार बड्या नेत्यांनी दिला राजीनामा

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now