Share

IPL 2022: घरात जेवणासाठी पैसे नव्हते, आता ‘हा’ खेळाडू झालाय करोडपती, मुंबई संघातून खेळणार

आयपीएलमध्ये सध्या अनेक नवीन तरुणांना संधी मिळत आहे. अनेकांचे नशीब यामुळे एका क्षणात बदलले आहे. ही अशी स्पर्धा आहे जी तुम्हाला शून्यातून शिखरावर घेऊन जाऊ शकते. सध्या खेळाडूंची खरेदी होत आहे, लिलाव सुरू आहे. त्यात अनेक तरुण गरीब खेळाडू मालामाल होत आहेत. या माध्यमातून कोट्याधीश झालेल्या अशाच एका तरुणाची कहाणी ऐकल्यावर तुम्ही थक्क व्हाल.

बंगळुरूमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएल लिलावात एका इलेक्ट्रिशियनच्या मुलावर कोट्यावधीची बोली लागली आहे. या नवीन खेळाडूचे नाव तिलक वर्मा आहे. तो अवघ्या 19 वर्षांचा आहे. तिलक कट शॉट, पूल चांगले मारतो. त्याचे वडील इलेक्ट्रिशियनचे काम करतात. तो गरीब कुटूंबातून येतो.

त्याच्या कुटूंबियांना या महागड्या क्रिकेट खेळाचा खर्च पेलवत नव्हता. मात्र त्याला हैदराबादच्या चंद्रयानगुट्टा भागात राहणाऱ्या त्याच्या प्रशिक्षकांनी मदत केली, आणि आज एवढ्या संघर्ष करणाऱ्या तिलक वर्माला आयपीएल लिलावात 1.7 कोटीची बोली लागली. यामुळे सर्वांना त्याचे कौतुक वाटत आहे.

तिलक वर्माची डावखुरा फलंदाज म्ह्णून ओळख आहे. त्याच्यावर 1.7 कोटीची बोली लावून आपल्या संघात घेणारी मुंबई इंडियन्सची टीम आहे. तिलक वर्मा हा 2022 च्या वर्ल्डकप विजेत्या संघात देखील होता. तो मधल्या फळीत फलंदाजी करतो. मात्र त्याला वर्ल्डकपमध्ये फारशी खेळण्याची संधी मिळाली नाही.

तिलक वर्मा देशांतर्गत क्रिकेट सामन्यात हैदराबादचे प्रतिनिधित्व करतो. त्याची यंदाच्या लिलावात बेस प्राईस 2 लाख इतकीच होती. त्याच्यासाठी पहिल्यांदा सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्सने बोली लावण्यास सुरूवात केली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने लिलावात उडी घेतली. अखेर मुंबई इंडियन्स ने त्याला संघात घेतलं.

तिलक त्याच्या यशाचे श्रेय कुटूंब आणि त्याचे प्रशिक्षक सलाम बायश यांना देतो. प्रशिक्षकांनी वेळ पडल्यास तिलकच्या खाण्यापिण्याची देखील सोय केली होती. तिलकचे वडील नम्बूरी नागराजू आपल्या मुलाला क्रिकेट अकादमीत पाठवण्याच्या परिस्थितीत नव्हते. मात्र सलाम यांनी तिलकचा आर्थिक भार उचलला याच संघर्षांवर तिलक आता इथंपर्यंत पोहचला आहे.

त्याच्याबद्दल अधिक सांगायचं झाल्यास, तिलक वर्माने आतापर्यंत 15 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 29.30 च्या सरासरीने तर 143.77 च्या स्ट्राईक रेटने 381 धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा देखील समावेश आहे. याचबरोबर ते ऑफ स्पिन गोलंदाजी देखील करतो.

खेळ

Join WhatsApp

Join Now