Share

IPL 2022: ‘या’ संघावर प्रचंड संतापले चाहते, म्हणाले, ‘१० वर्षात काहीही करू शकले नाहीत’

आईपीएल 2022 (IPL 2022) च्या 42 व्या सामन्यात पंजाब किंग्जला लखनौ सुपर जायंट्स (PBKS vs LSG) विरुद्ध 20 धावांनी लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लखनौचा संघ केवळ 153 धावा करू शकला. पंजाबला हा सामना जिंकण्याची चांगली संधी होती, मात्र खराब फलंदाजीमुळे या संघाने आणखी एक सोपा सामना गमावला. पंजाबच्या पराभवानंतर चाहते त्याच्यावर भडकले आहेत.(IPL 2022: Fans angry over ‘this’ team)

आयपीएलमध्ये गेल्या काही वर्षांपासून समोरच्या संघाला 2 गुण देणे ही पंजाबच्या संघाची सवय झाली आहे. असाच काहीसा प्रकार शुक्रवारी लखनौविरुद्धच्या सामन्यात घडला. 154 धावांचे सोपे लक्ष्य गाठण्यात या संघाला अपयश आले आणि अखेरीस 20 धावांनी सामना गमवावा लागला.

पंजाब किंग्जचा संघ 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 133 धावा करू शकला आणि त्यांनी हा सोपा सामना गमावला. या पराभवानंतर पंजाबच्या कामगिरीने सर्वांचीच निराशा झाली आहे. पंजाबच्या कामगिरीवर त्यांचे चाहतेही प्रचंड नाराज आहेत. पंजाब टीमला ट्विटर आणि सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले जात आहे.

गेल्या काही वर्षांपासून पंजाबकडे अनेक दिग्गज खेळाडू असायचे, मात्र संघातील खेळाडूंच्या चुकीच्या निवडीमुळे हा संघ प्रत्येक वेळी निराश करतो. एका युजरने तर ट्विट करताना लिहिले की पंजाबचा संघ या दशकातील सर्वात वाईट संघ आहे. अनेकांनी पंजाब संघाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले आहे. तसेच चाहत्यांनी ट्विटरवर ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

https://twitter.com/kmmk_vr46/status/1520092041882963968?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1520092041882963968%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fzeenews.india.com%2Fhindi%2Fsports%2Fipl%2Fipl-2022-fans-shows-anger-on-punjab-kings-after-loss-against-lucknow-super-giants%2F1169265

कागिसो रबाडा (4/38) आणि राहुल चहर (2/30) यांच्या शानदार गोलंदाजीमुळे लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्जसमोर 20 षटकांत 8 बाद 153 धावा केल्या आणि पंजाब किंग्जसमोर 154 धावांचे लक्ष्य ठेवले. लखनौ सुपर जायंट्ससाठी क्विंटन डी कॉक (46) आणि दीपक हुडा  यांनी 59 चेंडूत 85 धावांची शानदार भागीदारी केली. पंजाबकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक विकेट घेतल्या. मात्र कर्णधार मयंक अग्रवालसह सर्वच फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली.

महत्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या पैशामुळे तुटली अँड्र्यु सायमंड्स आणि मायकल क्लार्कची दोस्ती, वाचा नेमकं काय घडलं होतं?
नो बॉल वादानंतर ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूरला मोठा दणका, प्रवीण अमरेवरही एका सामन्याची बंदी
IPL मधील या गोष्टीवर दिनेश कार्तिकने उपस्थित केले प्रश्न, म्हणाला, हा तर सगळ्यात मोठा मुर्खपणा
के एल राहुलच्या मते हा खेळाडू आहे भारताचा एबी डिविलीयर्स; म्हणाला, ३६० डिग्री शॉट्स खेळण्यात सक्षम

खेळ ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now