Share

Ishaan Khattar: बालकलाकार म्हणून करिअरची सुरूवात, ५ वर्षात वयाने दुप्पट असलेल्या अभिनेत्रींसोबत दिले इंटिमेट सीन्स

ईशान खट्टर हा बॉलीवूडमधील अशा कलाकारांपैकी एक आहे ज्याने फार कमी वेळात आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांना प्रभावित केले आहे. ईशान खट्टरने जान्हवी कपूरसोबत ‘धडक’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असेल, परंतु बालकलाकार म्हणून ईशानने ‘लाइफ हो तो ऐसी’ या चित्रपटाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. चला तर मग आज त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही गोष्टी जाणून घेऊ. Ishaan Khattar, Janhvi Kapoor, Shahid Kapoor, Tabu, Siddhant Chaturvedi

इशान खट्टरचा जन्म 1995 मध्ये अभिनेत्री नीलिमा अजीम आणि अभिनेता राजेश खट्टर यांच्या घरी झाला. राजेश खट्टर यांनी 1990 मध्ये नीलिमा अझीमसोबत लग्न केले, परंतु त्यांचे लग्न केवळ 11 वर्षे टिकले. त्यानंतर दोघांचा घटस्फोट झाला. ईशान खट्टर हा अभिनेता शाहिद कपूरचा धाकटा भाऊ आहे. ईशान खट्टरने त्याचे संपूर्ण शिक्षण मुंबईतून केले आहे. जेव्हा ईशानने करिअरला सुरुवात केली तेव्हा तो फक्त 10 वर्षांचा होता.

इशान खट्टरने हाफ विडो या चित्रपटात सहदिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. ईशान खट्टरने मुख्य अभिनेता म्हणून इराणी निर्माता-दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ चित्रपटाद्वारे अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटात ईशान खट्टरसोबत अभिनेत्री मालविका मोहन मुख्य भूमिकेत होती. या चित्रपटातील ईशान खट्टरचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.

ईशान खट्टरने 2018 साली ‘धडक’ चित्रपटातून जान्हवी कपूरसोबत रोमान्स केला होता. यानंतर तो तब्बूसोबत नेटफ्लिक्सच्या वेब सीरिज ‘अ सुटेबल बॉय’मध्ये दिसला. या चित्रपटात त्याने त्याच्या दुप्पट वयाच्या तब्बूसोबत किसिंग सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या रोमान्स आणि किसिंग सीनवरून बराच गदारोळ झाला होता.

https://www.instagram.com/reel/CjhpnWEgS4H/?utm_source=ig_embed&ig_rid=bee65508-9cf4-451c-9305-f18d9ea79a37

इशान खट्टर कतरिना कैफसोबत फोन भूत या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सिद्धांत चतुर्वेदीही असणार आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होताच त्यातील एका इंटिमेट सीनची विशेष चर्चा झाली. या सिनेमात इशान आणि कतरिनाचा इंटिमेट सीन पाहायला मिळतो आहे. यात कतरिना रागिणी नावाच्या भूताच्या भूमिकेत आहे, त्यामुळे भूत आणि माणूस यांच्यातील लव्ह अँगल प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो. इशान आणि कतरिनामध्ये 13 वर्षांचे अंतर आहे. अवघ्या काहीच दिवसात या सिनेमा प्रदर्शित होणार असल्याने सध्या या सिनेमाची टीम प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now