Share

सिनेमात सेक्स सीन किंवा न्यूड सीन कसा शूट केला जातो? त्यामागची जबाबदारी कोण सांभाळतं?

gehraiyaan movie

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आगामी ‘गेहराइयां’ (gehraiyaan movie) हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहे. या चित्रपटात दीपिकासोबत अनन्य पांडे, सिद्धांत चतुर्वेदी आणि धैर्य करवा मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक शकुन बत्रा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून ११ फेब्रुवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यादरम्यान चित्रपटासंबंधित एक गोष्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

कोणत्याही चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरच्या शेवटी एक क्रेडिट प्लेट देण्यात येते. यामध्ये चित्रपटासंबंधित सर्व व्यक्तींना श्रेय देण्यात येते. तर ‘गेहराइयां’ या चित्रपटाचा टीझरच्या शेवटीही क्रेडिट प्लेट देण्यात आला होता. परंतु, या क्रेडिट प्लेटवरील एक नाव पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त केले. याचे कारण म्हणजे यामध्ये इंटिमेट दिग्दर्शकाच्या नावाचाही समावेश करण्यात आला होता. युक्रिनियमचे दिग्दर्शक डार गै यांना इंटिमेट दिग्दर्शक म्हणून यामध्ये श्रेय देण्यात आले होते.

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध लेखक असीम छाबडा यांनी ‘गेहराइयां’ टीझरच्या क्रेडिट प्लेटवरील ही गोष्ट लोकांच्या नजरेस आणून दिली. त्यांनी ‘गेहराइयां’ टीझरचा क्रेडिट प्लेटचा स्क्रीनशॉट काढून आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला होता. त्यासोबत त्यांनी लिहिले की, ‘मी चुकीचा असू शकतो. पण हे पहिल्यांदा आहे की एखाद्या भारतीय चित्रपटात (किंवा इतर चित्रपट) इंटिमेसी डायरेक्टरला श्रेय दण्यात आले आहे? मी डार गै यांना ओळखतो आणि या चित्रपटातील त्यांचे योगदान पाहण्यासाठी मी उत्सुक आहे’.

https://twitter.com/chhabs/status/1478614631103057920?s=20&t=PBjBRkTl_tMzrH0G5g–3w

असीम छाबडा यांचा हा ट्विट सर्वांचाच लक्ष वेधून घेतला. तसेच याबाबत चर्चाही झाली. त्यांच्या या ट्विटनंतर इंटिमेट दिग्दर्शक म्हणजे कोण आणि या दिग्दर्शकाची काय जबाबदारी असते, असा प्रश्न अनेकांना पडला. तर इंटिमेट दिग्दर्शक हा चित्रपटाचा दिग्दर्शक नसतो. तर कोणत्याही चित्रपट किंवा वेबसीरीजमध्ये न्यूड किंवा सेक्स सीनचे चित्रीकरण कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण करण्याची जबाबदारी इंटिमेट दिग्दर्शकावर असते.

भारतात तर इंटिमेट दिग्दर्शकावर अधिक जबाबदारी असते. सेक्स सीन चित्रित करतेवेळी अभिनेता आणि अभिनेत्री दोघेही कम्पर्टेबल आहेत की नाही, चित्रीकरण करत असताना कोणत्याही अडचणी येणार नाहीत, हे इंटिमेट दिग्दर्शकाला पाहावे लागते. सोबतच अभिनेता आणि अभिनेत्री या दोघांच्या वजनाचाही त्यांना विचार करावा लागतो.

जर एखादी अभिनेत्री सेक्स सीन करत असताना लाजत असेल किंवा तिला भीती वाटत असेल तर तेव्हा इंटिमेट दिग्दर्शक त्या अभिनेत्रीची समजूत काढतात. तसेच तिच्यासोबत काही चुकीचे होणार नसल्याची खात्रीसुद्धा देतात. तसेच जर एखादा अभिनेता सेक्स किंवा किंसिंग सीनदरम्यान अतिउत्साहित झाला तर त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहिले जात नाही.

त्यावेळी त्या अभिनेत्याची समस्या समजून घेऊन आणि त्याच्याशी बोलून सीन व्यवस्थितरित्या समजवावून सांगण्याची जबाबदारी इंटिमेट दिग्दर्शकाची असते. त्यानुसार इंटिमेट दिग्दर्शकाचे काम केवळ तांत्रिकतेपुरते मर्यादित नसते तर मानसशास्त्राशी संबंधितही असते.

इंटिमेट दिग्दर्शकाची निवडही चित्रपटाच्या सुरुवातीलाच करण्यात येते. ते यामुळे की, तो चित्रपट दिग्दर्शकासोबत मिळून सीन चित्रित करू शकेल. तसेच कलाकारांनी कोणते कपडे परिधान करावे, हे ठरवण्याची जबाबदारीसुद्धा इंटिमेट दिग्दर्शकावर असते. इंटिमेट दिग्दर्शक निवडण्याचा हेतू हा असतो की, सेक्स सीनच्या चित्रीकरणादरम्यान कोणताही अभिनेता किंवा अभिनेत्रीसोबत काही चुकीचे होऊ नये.

महत्त्वाच्या बातम्या :
मोठी बातमी! लतादीदींची प्रकृती बिघडली, पुन्हा ठेवण्यात आले व्हेंटिलेटरवर, डॉक्टर म्हणाले..
मधूबालाच्या ९६ वर्षाच्या बहिणीला सुनेने काढले घराबाहेर; जेवणही दिले नाही, टॉर्चर केल्यामुळे झाली भयानक अवस्था
‘व्हेलेंटाईन डे’ ला सलमान खानसोबत असणार कतरिना, विकी कौशलपासून राहणार दूर

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now