गुरुवारी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने एकहाती विजय मिळविला आहे. परंतु या निवडणुकीत पंजाबच्या मनसा संघातून उभे राहिलेल्या सोशल मीडियास्टार सिंध्दू मूसवालाला हार पत्करावी लागली आहे. सिध्दूचे इंस्टाग्रामवर मिलियनच्या घरात फोलोवर्स असताना देखील त्याला फक्त 36 हजार 700 मत मिळाली आहेत.
त्यामुळे सिंध्दूला या फोलोवर्सचा काही उपयोग झालेला दिसून येत नाही. सिंध्दूला मिळालेली मत पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. लोकांचे सिंध्दू वरचे प्रेम पाहून तो निवडणूकीत चांगल्या मतांनी जिंकून येईल अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु या आशेची आता निराशा झाली आहे.
सिंध्दूला इंस्टाग्रामला 7 मिलीयन फोलोवर्स आहेत. सिंध्दूने मनसा विधानसभा मतदारसंघातून आपचे उमेदवार विजय सिंग यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत सिंध्दूला 36 हजार 700 मत मिळाली असून विजय सिंगला 1 लाख 23 मत मिळाली आहेत. सिंग यांनी 63 हजार 323 मतांनी सिंध्दूला हरविले आहे.
त्यामुळे सोशल मिडीया स्टार निवडणूकीत फ्लोपस्टार ठरला आहे. मध्यंतरी कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यंनी केलेल्या आंदोलनात सिंध्दू चर्चेत आला होता. त्यांने या आंदोलनावर एक गाणे ही लिहले आहे. सिध्दूने एका सिनेमात काम देखील केले आहे. परंतु सिनेमावर एफआयआर दाखल आहे.
सिंध्दू मूसवालाला सोबत सोनू सूदची बहिण मालविका सुद सच्चर हिचाही पराभव झाला आहे. मालविका मोगा संघातून उभी राहिली होती. परंतु इथेही आपनेच बाजी मारली. आपने पंजाबमध्ये काँग्रेसचा जोरदार पराभव केला आहे. कोरोना काळात सोनू सूदसोबत स्थलांतरीत लोकांना मदत करण्यामध्ये मालविका पुढे होती.
पंजाबमध्ये आपची सत्ता आल्यानंतर जोरदार जल्लोषाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने पंजाबमध्ये सत्ता कायम ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. परंतु ती सर्व फसले आहेत. आपच्या विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब जनतेचे आभार मानत आता पंजाबचा विकास आपच्या हाती असल्याचे म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
उत्तर प्रदेशमध्ये शिवसेनेचा ‘फ्लॉप’शो; नितेश राणेंनी आकडेवारी दाखवत उडवली खिल्ली
शेतकऱ्याचा नाद नाय करायचा! फक्त २० गुंठ्यात घेतले ‘हे’ पिक अन् कमावले तब्बल सात लाख रूपये
पुन्हा रोहित शेट्टी दाखवणार एका कर्तबगार पोलिसाची कहाणी, जबरदस्त ऍक्शनमध्ये दिसणार ‘हा’ हिरो
पुढचं पाऊल’ मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला झालाय भयंकर आजार, शरीरातील अवयव जखडतायत