Share

sharad koli : आदित्य ठाकरेंनी ‘या’ खास माणसावर सोपवली मोठी जबाबदारी, गद्दारांना शिकवणार धडा 

शिवसेनेचा सध्या वाईट काळ सुरू आहे यात काहीच शंका नाही. हा वाईट काळ घालवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत आदित्य ठाकरेही त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत. हे सगळं सुरू असताना असे काही कट्टर शिवसैनिक आहेत जे पक्षाला पुन्हा जिद्दीने उभं करण्यासाठी झटत आहेत.

पक्षाची पुर्नबांधणी करण्यासाठी काही शिवसैनिक झटत आहेत. त्यातीलच एक नाव आहे शरद कोळी. आता आदित्य ठाकरेंनी शरद कोळी यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. युवासेनेच्या विस्तारकपदाची धुरा आदित्य ठाकरेंनी त्यांच्याकडे सोपवली आहे.

जेव्हा शरद कोळी यांनी युवा सेनेत प्रवेश केला होता तेव्हा त्यांनी बंडखोरांच्या मददारसंघात जाऊन मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं तेव्हा ते चर्चेत आले होते. त्याच कामावर खुश होऊन आदित्य ठाकरेंनी त्यांच्यावर आता मोठी जबाबदारी सोपवली आहे.

राज्य विस्तारकपदी निवड होताच शरद कोळी यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत. शरद कोळी यांनी निर्धार केला आहे की, उद्धव ठाकरेंची साथ सोडत ज्या ४० आमदारांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने नवं सरकार स्थापन केलं त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.

शरद कोळी यांनी सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर अशा तीन जिल्ह्यात युवासेनेचे कार्यक्रम घेत सभासद नोंदणी सुरू केली आहे. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नुकताच सांगोला दौरा केला होता त्यावेळी त्यांनी शरद कोळी यांच्या निवडीची घोषणा केली होती. त्यांनी तीन जिल्ह्यांमध्ये युवासेनेचे जंगी कार्यक्रम घेतले.

युवासैनिकांनी या कार्यक्रमाला गर्दी केली होती. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात युवासेनेचे कार्यालय स्थापन करून प्रत्येकाच्या मनात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे विचार पोहोचवेन असा निर्धारही त्यांनी केला आहे. तसेच त्यांनी असा शब्द दिला की, उद्धव ठाकरे यांनी नेमलेल्या प्रत्येक जिल्हाप्रमुखाला, शहरप्रमुखाला, महिला आघाडी प्रमुखाला सोबत घेऊन युवासेनेचा विस्तार करेन.

महत्वाच्या बातम्या
Krishna Abhishek: कपिलची बाजू घेत सुनील पालने कृष्णा आभिषेकवर केली सडकून टीका, म्हणाला, शो सोडून…
ED : भाजप आमदाराच्या बेहीशोबी संपत्तीच्या चौकशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ईडीला कोर्टाचा दणका; केली ‘ही’ कारवाई
Hrithik Roshan: विक्रम वेधाच्या टीझरमध्ये ह्रतिक रोशनकडून झाली ‘ही’ मोठी चूक, आमिरलाही पडली होती महागात
Krushna Prakash: “बाप्पाला तू शेवटपर्यंत जवळ ठेवलंस, गणपती येताहेत अन् तू गेलीस” IPS कृष्णप्रकाश गहीवरले

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now