Share

Road hipnosis : रोड हिप्नोसिसमुळे झाला विनायक मेटेंचा अपघात? त्यापासून बचाव कसा करायचा? वाचा सविस्तर..

vinayak mete

Road hipnosis : सध्याच्या धावपळीच्या जीवनात रस्ते अपघातात भीषण अपघात घडत आहेत, त्यात वाहन अपघातात मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू होत आहे. हे अपघात इतके भयंकर आहेत की, डोळ्यांचे पारणे फेडताना ते लोकांचा जीव घेतात. नुकताच विनायक मेटे यांचा अपघात झाला आणि त्यांना या अपघातात प्राण गमवावे लागले.

पुर्ण महाराष्ट्रावर दुखाचा डोंगर कोसळला. त्यांचा अपघात झाल्यानंतर रोड हिप्नोसिसचा मुद्दा पुन्हा वर आला. रोड हिप्नोसिसचे अनेक मेसेज आणि पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. नेमकं रोड हिप्नोसिस म्हणजे काय? याबद्दल बऱ्याच लोकांना खुप कमी माहिती आहे.

लखीमपूर खेरी येथील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. दिनेश दुआ यांच्या मते बहुतांश रस्ते अपघातांमध्ये रोड हिप्नोसिस हेही एक मोठे कारण असते. काय आहे रोड हिप्नोसिस? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. दिनेश दुआ यांनी सांगितले की, ‘कोणतेही वाहन चालवताना ही शारीरिक स्थिती असते. साधारणपणे अडीच ते तीन तास सतत ड्रायव्हिंग केल्यावर रोड हिप्नोसिस सुरू होते.

अशा अवस्थेत डोळे उघडे असतात, पण मेंदू काम करायचं बंद करतो. त्यामुळे जे दिसते त्याचे नीट विश्लेषण ड्रायव्हरकडून होत नाही आणि परिणामी थेट धडकून अपघात होतो. पुढे ते म्हणाले की, या हिप्नोसिस अवस्थेत, अपघातानंतर 15 मिनिटांपर्यंत चालकाला ना समोरच्या वाहनांची जाणीव असते ना त्याच्या वेगाची.

रोड हिप्नोसिसला टाळण्यासाठी त्यांनी सांगितले की, हिप्नोसिसची ही अवस्था टाळण्यासाठी दर अडीच-तीन तासांनी गाडी चालवल्यानंतर थांबले पाहिजे. चहा-कॉफी प्या, 5-10 मिनिटे विश्रांती घ्या आणि मन शांत करा. वाहन चालवताना विशिष्ट ठिकाण आणि काही वाहने ये-जा करताना लक्षात ठेवा.

जर तुम्हाला असे वाटत असेल की तुम्हाला शेवटच्या 15 मिनिटांपासून काहीही आठवत नाही, तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला आणि सहप्रवासींना मृत्युकडे नेत आहात. डॉ. दिनेश दुआ सांगतात की, रोड हिप्नोसिस अनेकदा रात्रीच्या वेळी अचानक सुरू होते.

जेव्हा इतर प्रवासी झोपलेले असतात किंवा दमलेले असतात. त्यामुळे फार मोठा अपघात होऊ शकतो. चालकाला डुकली लागली किंवा झोप लागली तर अपघात कोणीही थांबवू शकत नाही. पण डोळे उघडे असतील तर मन सक्रिय असणं खूप गरजेचं आहे. काळजी घ्या, सुरक्षित रहा, सुरक्षितपणे वाहन चालवा.

महत्वाच्या बातम्या
आमदार संतोष बांगर संतापले, शिवीगाळ करत थेट लगावली कानशिलात, व्हिडीओ व्हायरल
साहेबांना पाहताच क्षणी मला समजलं की.., विनायक मेटेंच्या डॉक्टर पत्नीचा धक्कादायक खुलासा
Aamir Khan: लाल सिंग चड्ढा प्लॉप झाल्यानंतर आमिरचे टेन्शन वाढले, डिस्ट्रीब्युटर्सने मागितली नुकसान भरपाई
Accident: विनायक मेटेंच्या अपघाताचे खरे कारण उलगडणार? पालघरमधून ट्रक ड्रायव्हरला अटक

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now