प्रसिद्ध कीर्नतकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांच्याबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांच्या यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कीर्नतासाठी जात असताना जालना जिल्ह्यातील परतूर येथे जात असताना रात्री १० च्या सुमारास अपघात झाला आहे. (indurikar maharaj road accident)
इंदुरीकर महारांजांच्या स्कॉर्पिओ गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये चालक किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती समोर आली आहे. इंदुरीकर महाराजांना कुठलिही इजा झाली नसून ते सुरक्षित असल्याचे समजते आहे. तसेच ज्या ठिकाणी हा अपघात झाला आहे, त्या ठिकाठी पोलिसांनी धाव घेतली आहे.
जालना जिल्ह्यातील खांडवीवाडी येथून कीर्तनासाठी जात असताना परतूर येथे एका वळणावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांच्या स्कॉर्पिओ गाडीने एका लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिली आहे. एमएच १२ टी वाय १७४४ या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओने इंदुरीकर महाराज प्रवास करत होते.
परतूर शहरातील साईनाथ कॉर्नरवर रस्ता क्रॉस करताना हा अपघात झाला आहे. या अपघातात किरकोळ जखमी झालेले चालक संजय गायकवाड यांना पोलिसांच्या मदतीने शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्याम सुंदर कौठाळे यांनी दिली आहे.
दरम्यान, इंदुरीकर महाराज हे राज्यभरात प्रसिद्ध असलेले कीर्नतकार आहे. ते नेहमीच त्यांच्या वक्तव्यांमुळे चर्चेत येत असतात. अनेकदा ते त्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकतात. त्यांचे सोशल मीडियावर अनेक कीर्तन व्हायरल होत असतात.
महत्वाच्या बातम्या-
IAS अधिकारी आहे की फिल्मचा हिरो; पर्सनॅलिटी पाहून 4 हजार तरुणींनी घातली लग्नासाठी मागणी, पाहा फोटो
मोदी मंत्रिमंडळात पुन्हा फेरबदलाच्या हालचाली; महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांना मिळू शकते संधी
ठाण्याचा वाघ आनंद दिघेंवर येणार चित्रपट; ‘हा’ अभिनेता साकारणार मुख्य भूमिका, टीझर आला समोर