समाज प्रबोधनकार कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे लाखों चाहते आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध नगरिकांपर्यंत इंदुरीकर महाराजांचे चाहते आहेत. मात्र अनेकदा त्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. अशातच पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
अकोला येथील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील किर्तनादरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळेस इंदुरीकर महाराजांनी युट्यूबर्सवर टीका केलीय. मात्र ही टीका करताना त्यांचा तोल ढळल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटणार असल्याची शक्यता आहे.
“आपल्या कीर्तनाचे व्हिडीओ अपलोड करून आतापर्यंत चार हजार लोकांनी यू्ट्यूबवर कोट्यवधी रुपये कमावले आहेत. त्यांच्यामुळेच मी अडचणीत आलो आहे. आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ क्लिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील,” असे इंदुरीकर महाराज म्हणाले आहेत.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे अकोला शहरातील कौलखेड भागात यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन अयोजित केलं होतं. यावेळी ते बोलत होते. आपल्या कीर्तनातून यूट्यूबवर व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर घसरणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी या आधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत.
पुढे बोलताना इंदुरीकर महाराज म्हणाले, ‘आपल्या कीर्तनाच्या व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करुन 4000 लोक कोट्यधीश झाली आहे, या लोकांमुळेच आपण अडचणीत आलो आहे. माझ्याच किर्तनाच्या क्लिप बनवून मलाच कोर्टात खेचलं. यांचं वाटोळच होणार यांचं कधीच चांगलं होणार नाही असे ते म्हणाले.
दरम्यान, चार हजार यूट्यूबवाले कोट्यधीश झाले माझ्या नावावर, नालायकांना पैसे मोजता येईना, आणि माझ्यावरच चढले, माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्यावर तयार केल्या, यांचं वाटोळंच होणार, यांचं चांगलं होणार नाही, क्लिपा टाकणाऱ्यांचं मुलं दिव्यांग जन्माला येतील हा विनोद नाही, जे सत्य आहे, असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयाच्या घरी आयकर विभागाची धाड, राजकीय वर्तुळात खळबळ
गप्प बसलात तर तुम्हाला राष्ट्रपती करू म्हणाले होते पण मी.., मोदी सरकारबाबत मलिकांचा खळबळजनक खुलासा
क्रिकेटर्स माझ्याकडे टक लावू बघायचे, माझा अपमान करायचे, मंदिराने सांगितला भितीदायक अनुभव
अनुपम खेर यांचे शर्टलेस फोटो व्हायरल; फिटनेसच्याबाबतीत अनिल कपूर यांनाही देताहेत टक्कर