ग्रामीण भागातील सर्वसामान्य लोकांना विविध प्रकारांच्या आजारांचे उपचार एकाच छताखाली देण्यात यावेत यासाठी प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी गुडगाव-दिल्ली, कर्नाटक, अहमदाबादच्या धरतीवर पुणे जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रासाठी पहिली ‘इंद्रायणी मेडिसिटी’ उभारण्यात येणार आहे.(Indrayani Medicity project to be set up in Pune on 300 acres)
या अंतर्गत सुमारे ३०० एकराहूनही अधिक जागेत या इमारती उभारण्यात येणार आहेत. यामध्ये विविध प्रकारच्या २४ स्वतंत्र इमारती निर्माण केल्या जाणार आहेत.
जिल्ह्यातील खेड लोकसभा मतदार संघात हा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. परंतु राज्याच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाचा केवळ उल्लेख केला आहे. प्रत्यक्ष तरतूद मात्र करण्यात आली नाही.
जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने हा आराखडा तयार केला आहे. कागदावरच असलेला हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी आणखी किती वर्ष लागतील हे सांगणे मात्र कठीण आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहा महिन्यापूर्वीच मेडिसिटी विकास आराखडा तयार करण्यास परवानगी दिली आहे.
या संदर्भात जिल्हापरिषदेच्या वतीने राज्य शासन व आरोग्य विभागाला सादरीकरण करण्यात आले आहे. आता शासनाच्या अर्थसंकल्पनात याचा उल्लेख करण्यात आल्याने या प्रकल्पाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पात लोकांच्या उपचारासाठी एकाच ठिकाणी १० ते १५ हजार खाटांची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. या प्रकल्पात ट्रामा क्रिटीकल, हृदयरोग, मुत्रपिंड, मेंदुरोग, दंतचिकित्सा, बालरोग, नेत्ररोग, एंडोक्रयनोलॉजी, गास्ट्रोएन्ट्रोलॉजी, मूत्ररोग, अवयव प्रत्यारोपण, आयुष जनरल रुग्णालय, मानसिक पुनर्वसन केंद्र, स्पोर्ट्स मेडिसीन, कॅन्सर यासह तब्बल २४ स्वतंत्र रुग्णालयांचा समावेश असेल.
महत्वाच्या बातम्या
वाहन चालकांसाठी मोठी बातमी, वाहनात आता CNG किट बसवता येणार नाही? वाचा नवीन नियमांबद्दल..
दारूड्या आमदाराच्या गाडीने २५ जनांना चिरडले; संतप्त लोकांनी गाडीसह आमदारालाही फोडले