सध्या सुरु असलेल्या महिला विश्र्वचषक स्पर्धांमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करताना दिसत आहे. परंतु या भारतीय संघापेक्षा खेळाडू स्मृती मानधनाच सोशल मिडीयावर वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. स्मृती मानधना सध्या एका गायकाला डेट करत असल्याचे या चर्चेतून समोर आले आहे.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, स्मृती लोकप्रिय गायिका पलक मुच्छलचा भाऊ पलाश मुच्छलला डेट करत असल्याचे सांगितले जात आहे. पलाश आणि स्मृतीला अनेकवेळा काही ठिकाणी सोबत पाहण्यात आले आहे. नुकताच पलाशने सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमुळेच सोशल मिडीयावर चर्चेला उधाण आले आहे.
पलाशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या हातावर SM18 अस लिहलेला टॅटू दिसत आहे. याचा अर्थ SMRUTI MANDHANA असल्याचे वर्तविले जात आहे. मुख्य म्हणजे स्मृतीच्या जर्सीचा 18 नंबरच आहे. त्यामुळे या टॅटूच्या मागच्या व्यक्ती स्मृतीच असल्याचे चाहत्यांकडून सांगण्यात येत आहे.
https://www.instagram.com/reel/CZ1bnUeh20w/?utm_medium=copy_link
ज्यावेळी पलाशचे आखरी बार गाणे रिलीज झाले होते. तेव्हा या गाण्याचे प्रमोशन स्मृतीने केले होते. यानंतर दोघे अनेक ठिकाणी सोबत दिसून आले. मध्यंतरी पलाश तुझ्यासाठी इतका खास का आहे असे स्मृतीला विचारण्यात आले होते. परंतु या प्रश्नाचे उत्तर देण्यास स्मृतीने नकार दिला होता.
एका मुलाखतीत बोलताना स्मृतीने कार्तिक आर्यन आपला क्रश असल्याची माहिती दिली होती. परंतु तिने पलाश विषयी काहाही वक्तव्य केलेले नव्हते. सध्या सोशल मिडीयावर अनेक चर्चा रंगल्या असताना देखील पलाश आणि स्मृतीने आपल्या नात्याविषयी उघडपणे कोणताही खुलासा केलेला नाही.
दरम्यान भारतीय खेळाडू स्टार स्मृती मानधना सोशल मिडीयावर अनेकांची क्रश आहे. स्मृती आपल्या दमदार परफॉर्मन्समुळे नेहमी चर्चेत असते. सध्या सुरु असलेल्या सामन्यात 118 बॉलमध्ये स्मृतीने 13 फोर आणि 2 सिक्स मारले. यात तिचा स्ट्राईक रेट 104.24 चा होता.