indias last match result | भारतीय संघ टी २० वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करताना दिसून येत आहे. भारताचे आतापर्यंत ४ सामने झाले असून त्यापैकी ३ सामने भारतीय संघाने जिंकले आहे. भारताचा बांगलादेश, पाकिस्तान, नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामने झाले आहे. त्यापैकी फक्त आफ्रिकेने भारताला पराभूत केले आहे.
असे असले तरी भारतीय संघाला अजून सेमी फायनलमध्ये स्थान मिळवता आलेले नाही. झिम्बाब्वेच्या सामन्यामध्ये आता भारताचे भविष्य ठरणार आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकला तर भारत सेमी फायनलमध्ये जाणार आहे. पण सामना रद्द झाला किंवा भारताचा पराभव झाला तर काय होईल हे आता आपण जाणून घेणार आहोत.
ऑस्ट्रेलियात अजूनही पाऊस पडत आहे. त्यामुळे कधी कोणता सामना रद्द होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहे. जर पावसामुळे भारत-झिम्बाब्वेचा सामना रद्द झाला, तर दोघांना १-१ गुण देण्यात येईल. भारताचे सध्या ६ गुण त्यामुळे सामना रद्द झाला तर भारताचे ७ गुण होतील.
तसेच दक्षिण आफ्रिकेचे आता ५ गुण आहे. त्यामुळे त्यांनी जर सामना जिंकला, तर त्यांचे ७ गुण होतील. जर भारत आणि आफ्रिका या दोन्ही संघाचे गुण सारखे असतील, तर ज्याचा रनरेट जास्त असले तो अव्वल स्थानावर पोहचेल. तसेच जो संघ अव्वल स्थानावर असेल तो संघ इंग्लडशी सामना खेळेल, तर दुसऱ्या स्थानावर असलेला संघ हा न्युझीलंडशी सामना खेळेल.
भारताचा या सामन्यात पराभव झाला, तर भारतीय संघ टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडू शकतो. कारण पाकिस्तानच्या संघाचीही सेमी फायनलमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्यामुळे त्यांचे ४ गुण झाले आहे. त्यांनी त्यांचा जर अखेरचा सामना जिंकला तर त्यांचे ६ गुण होतील.
भारताने जर शेवटचा सामना गमावला तर दोघांचे ६ गुण राहतील. त्यावेळी दोघांचा रनरेट बघितला जाईल. सध्या पॉईंट्स टेबलकडे पाहिले तर पाकिस्तानचे गुण जरी कमी असले तरी त्यांचा रनरेट भारतापेक्षा चांगला आहे. भारताचा रनरेट ०.७३ आहे, तर पाकिस्तानचा रनरेट १.११७ असा आहे. त्यामुळे भारताने अखेरचा सामना गमावला आणि पाकिस्तानने तो जिंकला तर भारत टी २० वर्ल्डकपमधून बाहेर पडू शकते. त्यामुळे अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या-
स्वत:च्यात गच्चीवर तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार, कॅमेऱ्यात कैद झाली घटना
Gautami Patil : मी पण कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…; गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगेंची धक्कादायक प्रतिक्रिया
गुंतवणूकदार मालामाल! २० रुपयांचा शेअर गेला थेट १३९० रुपयांवर, १ लाखांचे झाले ७० लाख






