Share

Trinamool: ‘भारतातील सर्वात मोठे पप्पू अमित शहा आहेत’; पहा कुणी केलीय हे म्हणायची हिंमत

amit shah

तृणमूल(Trinamool): गेल्या आठवड्यात शुक्रवारी कोळसा तस्करी प्रकरणी ईडीने तृणमूलचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी केली होती. यानंतर, तिथून बाहेर येताच अभिषेकने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, अमित शाह भारताचे सर्वात मोठे पप्पू आहे.

दुसऱ्याच दिवशी बॅनर्जी यांचे नातेवाईक आकाश बॅनर्जी आणि अदिती ग्याने यांनी शाह यांचे कार्टून असणारे ‘टी-शर्ट’ घातलेले फोटो शेअर केले. त्यानंतर सीबीआयने दोन दिवसांपूर्वी राज्याचे कायदामंत्री आणि तृणमूल नेत्याच्या निवासस्थानावर छापे टाकले तेव्हा त्यांनी शाह यांचे व्यंगचित्र असलेला ‘टी-शर्ट’ घालून निषेध केला.

आता तृणमूल काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना दुर्गापूजेच्या वेळी प्रतिस्पर्धी भाजपचे दिग्गज आणि गृहमंत्री अमित शहा यांना लक्ष्य करणाऱ्या खास ‘टी-शर्ट’ची अधिकाधिक प्रसिद्धी करण्यास सांगितले आहे. ‘टी-शर्ट’वर भाजप नेते शाह यांच्या चेहऱ्याचे व्यंगचित्र असून त्यावर ‘भारताचा सर्वात मोठा पप्पू’ असे लिहिले आहे. हा ‘टी-शर्ट’ पांढरा, काळा, पिवळा अशा अनेक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

भाजप अनेकदा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांना ‘पप्पू’ म्हणून संबोधते. ज्याद्वारे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्ष आता शहा यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी, दुर्गापूजेच्या वेळी या मोहिमेवर भर देण्याचा पक्षाचा मानस आहे, कारण त्या वेळी बंगालच्या अनेक भागांमध्ये पंडालमध्ये लोक मोठ्या संख्येने जमतात.

तृणमूलच्या सूत्रांनी सांगितले की, अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांना त्याचे नवीन ‘डिझाईन’ तयार करून सुमारे 300 रुपयांना (टी-शर्ट) विकण्यास सांगितले आहे. ओब्रायन म्हणाले की, पूर्वी हे टी शर्ट फक्त ऑनलाईन उपलब्ध होते. आता ते बाजारातूनही विकत घेता येते. सध्या यातील तीन ते चार ‘डिझाईन’ उपलब्ध असून, दुर्गापूजा उत्सवापर्यंत आणखी डिझाईन्स येतील, असे खासदार म्हणाले.

ओब्रायनने स्वत: पांढरा टी-शर्ट घातलेले फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर शेअर केले आहेत. ओब्रायन म्हणाले की, 25 वर्षांखालील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा पक्षाचे कार्यकर्ते हे ‘टी-शर्ट’ बनवत आहेत. त्याची ‘डिझाईन’ उत्कृष्ट आहे. असाच एक ‘टी-शर्ट’ कोलकत्ता येथून दिल्लीला येताना विमानातही घातला होता.

भाजपा नेते राहुल सिन्हा यांनी या प्रकाराला प्रत्युत्तर दिले. म्हणाले, हा वैयक्तिक हल्ला असून, फ्लॉप शो आहे. “भाजपासोबत लढण्यासाठी तृणमूलकडे कोणताही मुद्दा नाही. यामुळे ते वैयक्तिक लक्ष्य करत आहेत. पक्ष संपण्याच्या मार्गावर चालला असल्याचं यातून दिसत आहे,”

महत्वाच्या बातम्या
Nashik : गणपतीची मिरवणूक प्रचंड उत्साहात मशिदीजवळ आली अन् तेवढ्यात सुरू झाली अजान..; पुढे जे घडलं असं काही की…
Elizabeth : ‘या’ सवयी राणी एलिझाबेथ यांना आरोग्यासाठी ठरल्या फायदेशीर; ९६ वर्षे हसतमुख जगण्याचं रहस्य आलं समोर
Navneet Rana : मेहनतीने पोलिस अधिकारी झालेत तुमच्या सारखे लोकांना किराणा वाटून…; पोलिस पत्नीने राणांना सुनावले
Sanjay raut : संजय राऊतांच्या भावाला अचानक मातोश्रीवर बोलावलं, पडद्यामागे नेमकं काय घडतय? जाणून घ्या..

राजकारण इतर ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now