Share

य़ुक्रेनच्या सैन्यात सामील झाला भारतीय तरुण; रशियाविरुद्ध शस्त्र उचलत म्हणाला…

रशिया आणि युक्रेनमध्ये मागच्या १३ दिवसांपासून युद्ध सुरु आहे. रशियाच्या सततच्या आक्रमणामुळे युक्रेनमधील अनेक शहरे उद्वस्त झाली आहेत. रशियाशी झुंजणाऱ्या युक्रेनने सामान्य नागरिकांनाही देशाच्या रक्षणासाठी युद्धभूमीवर उतरण्याचे आवाहन केले होते. तसेच युक्रेनने तिथे राहणाऱ्या इतर देशांच्या नागरीकांना युक्रेनच्या बाजूने युद्धात उतरण्याचे आवाहन केले होते.(Indian youth joins Ukrainian army)

या आवाहनाला हिंदुस्तानच्या एका तरुणाने प्रतिसाद दिला असून त्याने युक्रेनच्या रक्षणासाठी शस्त्र उचलले आहे. सैनिकेश रविचंद्रन असे त्याचे नाव आहे. तो तामिळनाडूच्या कोईम्बतूरचा येथील रहिवासी आहे. हा तरुण युक्रेनच्या निमलष्करी दलात सामील झाला आहे. सैनिकेश रविचंद्रन हा २०१८ पासून युक्रेनमधील खारकीव नॅशनल एरोस्पेस युनिव्हर्सिटीमध्ये विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेत आहे.

अभ्यासक्रमाच्या चौथ्या वर्षात शिकत आहे. सैनिकेश हा जॉर्जियन नॅशनल लीजन या युक्रेनमधील निमलष्करी दलात सामील झाला आहे. ही माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हिंदुस्तानी विद्यार्थी मायदेशी परतत आहेत. सर्व राज्यांमधील विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. कोईम्बतूरचा रहिवासी असलेल्या सैनिकेशने मात्र मायदेशी न परतता, युक्रेनसाठी रशियाविरोधात लढायचे ठरवले आहे.

इतर हिंदुस्तानी देशात परतत असताना सैनिकेशने युक्रेनमध्येच राहून रशियाविरोधात लढायचा निर्णय का घेतला. याचा माग काढण्यासाठी गुप्तचर यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सैनिकेशच्या कोईम्बतूर इथल्या घराची झडती घेतली. यावेळी त्यांना सैनिकेशच्या खोलीमध्ये सैनिकांची पोस्टर लावलेली पाहायला मिळाली.

सैनिकेशने १२ वीनंतर सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न केला होता. त्याने चेन्नईतील अमेरिकेच्या दूतावासाशी संपर्क साधून अमेरिकन सैन्यात सामील होण्याची संधी मिळू शकते का अशी विचारणा केली होती. मात्र त्याला त्यावेळी नकार देण्यात आला होता. हा नकार कळाल्यानंतर त्याने युक्रेनमधल्या खारकीव्हमध्ये असलेल्या राष्ट्रीय अवकाश विद्यापीठात प्रवेश घेतला होता.

सध्या युक्रेनमध्ये निर्माण झालेल्या स्थितीमुळे त्याला तेथील सैन्यात सामील होण्याची संधी मिळाली. काहीदिवसांपूर्वी सैनिकेशच्या पालकांनी त्याला हिंदुस्तानात परतण्याचे आवाहन केले होते. मात्र मी येणार नसल्याचे त्याने पालकांना सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या
उत्तरप्रदेशमध्ये भाजप आघाडीवर येताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; सपा आणि काँग्रेसची दशा दाखविणारे मीम्स व्हायरल
कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिसांच्या मुलांचेच लागले ‘वॉन्टेड’ पोस्टर; महाराष्ट्र हादरलं

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now