Share

५० किलोमीटरसाठी ६० हजार रुपये देऊन पोलंडला पोहोचला भारतीय विद्यार्थी, युक्रेन बॉर्डरवर कोणच करेना मदत

माजी सदस्य वीरेंद्र शर्मा यांचा मुलगा दीपांशु हा युक्रेनला लबिव (indian student in ukraine) शहरात एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी गेला आहे. वीरेंद्रने सांगितले की, तो त्याच्या मित्रांसह लॅबिव्हहून पोलंडच्या सीमेवर पोहोचला, पण त्यांना सीमेवर प्रवेश दिला जात नव्हता. त्याच्याकडचे पैसेही संपले होते. 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर दीपांशुने त्याच्या काही मित्रांसह पोलंडमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.(Indian student paying Rs 60,000 for 50 km)

एका टॅक्सी चालकाने त्यांना पोलंडमध्ये सोडण्यासाठी 800 डॉलर्स म्हणजे सुमारे 60 हजार रुपये मागितले, हा फक्त 50 किलोमीटरचा प्रवास होता. कसेबसे पैशांची व्यवस्था करून हे लोक सोमवारी रात्री अकराच्या सुमारास टॅक्सीने पोलंडला निघाले आणि रात्री दोन वाजता पोलंडमध्ये दाखल झाले. दीपांशुने कुटुंबीयांना सांगितले की, टॅक्सी चालकाने त्यांना इंडियन एम्बेसीजवळ सोडले. इंडियन एम्बेसीने त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली. आता ते फ्लाइटची वाट पाहत आहेत.

भारत सरकारच्या सर्व प्रयत्नांनंतरही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना तेथून बाहेर पडण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. वाहतुकीची साधने नसल्याने लोक केवळ पायीच चालत नाहीत, तर 8 तासांचा प्रवास पूर्ण करण्यासाठी त्यांना 3-4 दिवस लागत आहेत. सागर ग्यानचंद गुप्ता हा भाईंदर पश्चिम येथील रहिवासी आहे. सागर हा एमबीबीएसच्या अभ्यासासाठी युक्रेनच्या दक्षिणेला असलेल्या उदेसा शहरात राहतो.

रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालली आहे. सागर सांगतो की तो आणि त्याच्यासारखे शेकडो विद्यार्थी 23 फेब्रुवारीपासून उदेसाहून रोमानियाला येण्याचा प्रयत्न करत होते. दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर, एक बस चालक त्यांना युक्रेन-रोमानिया सीमेवर सोडण्यास तयार झाला. सागरच्या म्हणण्यानुसार, उदेसा ते सिरेत बॉर्डर हे अंतर 700 किलोमीटर आहे आणि सामान्य दिवसात हे अंतर 8-9 तासांत कापले जाते, परंतु युद्धकाळात हे अंतर कापण्यासाठी त्यांना 25 तास लागले.

सागर सांगतो की, हे सर्वजण सैराट सीमेच्या 12 किलोमीटर आधी बसमधून उतरले. सर्व लोकांना 30-40 किलो वजनाचे सामान घेऊन सुमारे 3 तास चालावे लागले. असाच काहीसा प्रकार युक्रेन-पोलंड सीमेवर बिहारच्या गोपालसोबत घडला, जेव्हा त्याला 40 किमी चालावे लागले. हे अंतर कापण्यासाठी त्यांना 9 तास लागले. मात्र, 9 तास चालल्यानंतर गोपाल युक्रेन-पोलंड सीमेवर पोहोचला तेव्हा येथून फक्त युक्रेनच्या नागरिकांनाच परवानगी दिली जात असल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्यात आले. अशा स्थितीत त्याचा त्रास दुपटीने वाढला.

सागरने सांगितले की, 25 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता निघून ते 26 फेब्रुवारीला दुपारी 1 च्या सुमारास सीमेजवळ पोहोचले, पण तिथेही त्यांचा त्रास कमी झाला नाही. सुमारे 8 तास रांगेत उभे राहिल्यानंतर ते रोमानियामध्ये प्रवेश करू शकले. यादरम्यान रात्री बर्फवृष्टीही झाली आणि तापमान माइनसमध्ये गेले. 27 फेब्रुवारीच्या रात्री सुमारे 3 वाजता ते रोमानियामध्ये प्रवेश करू शकले, जिथे त्यांना एक दिवस आश्रयस्थानात ठेवण्यात आले होते.

मंगळवार 1 मार्च रोजी, सागर आणि त्याच्यासारखे हजारो भारतीय विद्यार्थी सिरते सीमेपासून 800 किमी अंतरावर असलेल्या रोमानियातील बुखारेस्ट विमानतळावर पोहोचले. सागरने सांगितले की, सामान्य दिवसात हा प्रवास 1 दिवसात पूर्ण केला जाऊ शकतो, पण तोच प्रवास करण्यासाठी त्यांना 5 दिवस लागले. त्यांच्या मते, त्यांच्यासारख्या हजारो लोकांना हा पाच दिवसांचा प्रवास आयुष्यभर लक्षात राहील.

महत्वाच्या बातम्या-
अंकिता लोखंडेने विकत घेतली आलिशान मर्सिडीज कार, किंमत वाचून डोळे पांढरे होतील
राणे पिता- पुत्रांना होणार अटक? दिशा सालियनप्रकरणी पोलिसांकडून नोटीस
अशुद्ध मराठी बोलणाऱ्यांना सोनालीने मारला टोमणा, नेटकऱ्यांनी तिच्याच चुका काढत झापले
रशियाने १५ वर्षांत सर्वोत्तम सैन्य कसं उभारलं? ज्याला घाबरून अमेरिकासुद्धा थरथर कापतीय; जाणून घ्या..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now