Share

मोती पिकवण्यात जपानलाही मागे टाकणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सोनकर यांना पद्मश्री, वाचा त्यांच्याबद्दल..

अलाहाबादच्या मध्यमवर्गीय कुटुंबातील डॉ. अजय सोनकर(Dr. Ajay Sonkar) लहानपणापासूनच भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयात निष्णात होते. १९९१ च्या दरम्यान, वारंगल प्रादेशिक अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकी केलेल्या डॉ. सोनकर यांनी टीव्हीवर पर्ल कल्चरवर एक कार्यक्रम पाहिला.(indian-scientist-who-surpasses-japan-in-pearl-production-padma-shri-to-sonkar)

ज्यामध्ये जपानी शास्त्रज्ञ टिश्यू कल्चर वापरून मोती बनवत होते. मग त्यांनी ठरवले की आपल्यालाही मोती उगवायचे आहेत. इंटरनेट आणि महागड्या लॅबशिवाय हे काम अजिबात सोपे नव्हते. अशा कल्चरचे मोती बनवण्याचे तंत्रज्ञान केवळ जपानकडेच होते, मात्र दीड वर्षांच्या प्रयोगानंतर त्यांनी कृत्रिम मोती बनवून देशातील तसेच जगाच्या शास्त्रज्ञांना चकित केले.

यासोबतच कल्चरचे मोती बनविणाऱ्या देशांमध्ये भारताचे नाव समाविष्ट करून घेण्याचा करिष्माही एक्वाकल्चरल साइंटिस्ट डॉ.अजय सोनकर यांनी केला. गेल्या तीन दशकांच्या कारकिर्दीत डॉ. सोनकर यांनी मोती लागवडीच्या क्षेत्रात विविध कामगिरी केली आहे.

डॉ. सोनकर यांनी जगभरातील किमान ६८ देशांमध्ये मोती कल्चरविषयी व्याख्याने दिली आहेत. त्यांचे डझनभर शोधनिबंध अनेक जलसंवर्धन जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यावेळी माजी राष्ट्रपती ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम’ यांनी डॉ. सोनकर यांचा शोध ही देशासाठी मोठी उपलब्धी असल्याचे वर्णन केले होते.

डॉ.सोनकर हे स्वत:च्या प्रयोगशाळेत स्वतंत्रपणे काम करत आहेत. त्यांची एक प्रयोगशाळा अंदमानात आणि एक प्रयागराजमध्ये आहे. टिश्यू कल्चरपासून मोती बनवण्याच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर, ऑयस्टरमधील टिश्यू बाहेर काढून कृत्रिम वातावरणात ठेवून मोती उगवले जातात.

म्हणजेच मोती पिकवण्यासाठी ऑयस्टरची गरज भासणार नाही. यासोबतच त्या ऑयस्टरसाठी(oysters) आवश्यक असलेल्या सागरी वातावरणाची गरज भासणार नाही. डॉ. अजय सोनकर यांचे हे नवीन संशोधन समुद्री प्राण्यांच्या जगावर केंद्रित असलेल्या एक्वाकल्चर युरोप सोसायटी या वैज्ञानिक जर्नलच्या सप्टेंबर २०२१ च्या अंकात प्रकाशित झाले आहे.

या संशोधनानुसार डॉ. अजय सोनकर यांनी प्रयागराज येथील त्यांच्या प्रयोगशाळेत अंदमान आणि निकोबार बेटांच्या ऑयस्टर टिश्यूपासून मोती वाढवण्याचे काम केले आहे. त्यांच्या सततच्या प्रयोगांसाठी त्यांना यंदाच्या ‘पद्मश्री पुरस्कारा’ने सन्मानित केले आहे.

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now