भारतीय संघाने आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिका दणक्यात जिंकली आहे. भारतीय संघाचा सध्या इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात आयर्लंडविरुद्धची टी-20 मालिकेतील एकाही खेळाडूचा समावेश करण्यात आलेला नाही. यादरम्यान आयर्लंडविरुद्धच्या(Irland) टी-20 मालिकेतील संघ सध्या इंग्लंडला रवाना झाला आहे.(indian player eshan kishan, hardik pandya and akshar patel viral video)
यामध्ये हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल या खेळाडूंचा देखील समावेश आहे. यादरम्यान या तिन्ही खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल एक खेळ खेळताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल यांचा कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे मोकळ्या वेळेत हे तिन्ही खेळाडू ‘कावळा उड, चिमणी उड’ हा खेळ खेळत आहेत. हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल हा खेळ खेळत असतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये एक, दोन, तीन असे म्हणत हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल हा खेळ सुरु करतात. यामध्ये सुरवातीला अक्षर पटेल चुकतो. त्यामुळे अक्षरला खेळातून बाद व्हावे लागते. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि इशान किशन हा खेळ खेळू लागतात. हार्दिक पंड्या, इशान किशन आणि अक्षर पटेल हा खेळ खेळताना खूप एन्जॉय करत असल्याचे दिसून येत आहे.
हा व्हिडिओ पाच लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. एका युजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले आहे की, ‘भारतीय खेळाडू छान खेळ खेळत आहेत.’ तर दुसऱ्या एक युजरने कमेंट करत लिहिले आहे की, ‘भारतीय खेळाडू चांगला टाइमपास करत आहेत.’ अनेकांनी या व्हिडिओला लाइक देखील केले आहे.
भारतीय संघ सध्या इंग्लंड विरुद्ध पाचवा कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात भारताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने शतक झळकावले आहे. तसेच या सामन्यात रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने इंग्लंड विरुद्धच्या या सामन्यात ७ बाद ३३८ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या :-
पंतने एका झटक्यात मोडला धोनीचा 17 वर्षांपुर्वीचा रेकॉर्ड, 120 वर्षांनंतर पहिल्यांदाच झालं असं काही..
शिवसेने पुन्हा उभी फूट! आता आदेश बांदेकरांवर आरोप करत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
PHOTO: रश्मिका मंदान्ना ते नयनतारा, मेकअपशिवाय या 7 साऊथ अभिनेत्रींना ओळखणेही आहे कठीण