Share

‘Indian Idol 12’ फेम सायली कांबळेचे पतीसोबतचे रोमॅंटिक फोटो झाले व्हायरल, एकदा बघाच..

Indian Idol 12

‘इंडियन आयडल १२’ (Indian Idol 12) या शोची दुसरी उपविजेती सायळी कांबळे नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. सायलीने २४ एप्रिल रोजी तिचा बॉयफ्रेंड धवल पाटीलसोबत लग्नगाठ बांधली असून त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर आता सायलीने लग्नानंतरचे तिचे काही खास फोटो शेअर केले आहेत.

सायलीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये सायली जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसलेली दिसत आहे. तसेच त्यावर साजेसे दागिने, हातात मेहंदी आणि चुडा, नाकात नथ, केसात अंबाडा अशा मराठमोळ्या लूकमध्ये सायली फारच सुंदर दिसत आहे. तर सायलीच्या चेहऱ्यावरील गोड हास्य तिच्या सौंदर्याला चार चाँद लावत आहेत.

लग्नानंतरचा तेज सायलीच्या चेहऱ्यावर खुलून दिसत आहे. तर सायलीचा पती धवलने यावेळी पिवळ्या रंगाची पारंपारिक शेरवानी घातली आहे. दोघेही या फोटोत रोमँटिक अंदाजात दिसून येत आहेत. तसेच या फोटोंमध्ये सायलीच्या सासरचे मंडळीसुद्धा दिसून येत आहेत.

फोटो शेअर करत सायलीने ‘मिसेस धवल पाटील’ असे कॅप्शन दिले आहे. तर तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. तसेच तिच्या या फोटोंवर अनेक कमेंट करत सायली आणि धवल या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सायलीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, सायलीने सप्टेंबर २०२१ साली सोशल मीडियावर बॉयफ्रेंड धवलसोबतचा एक फोटो शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. या फोटोत सायली धवलला मिठी मारताना दिसून आली होती. फोटो शेअर करत तिने लिहिले होते की, ‘चला तर स्पष्टच सांगते. एवढीच गोष्ट आहे की, मला तुझ्यावर प्रेम झाले आहे’. यासोबत सायलीने हार्टचा इमोजीसुद्धा पोस्ट केला होता. तिच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी तिला अनेक शुभेच्छा दिल्या होत्या.

दरम्यान, सायलीने ‘इंडियन आयडल १२’ (Indian Idol 12) या शोची दुसरी उपविजेती ठरली होती. तिने शोचा किताब जिंकला नसला तरी तिच्या मधुर आवाजाने प्रेक्षक आणि परिक्षकांचे मन जिंकून घेतले होते. शोनंतर सायलीने ‘कोल्हापूर डायरी’ या चित्रपटात एक गाणं गायलं होतं. अवधूत गुप्ते यांनी या चित्रपटाला संगीत दिलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या :
National Language Controversy : अजय-सुदीपच्या हिंदी भाषेच्या वादावर कलाकारांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले…
‘प्राईम टाईम आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे’; शेर शिवराजला प्राईम टाईम न मिळाल्याने संतापला अभिनेता
चार-पाच वर्षांपासून मुलासाठी प्रयत्न करतोय पण.., ‘लॉकअप’मध्ये अभिनेत्रीच्या खुलाश्याने प्रेक्षक भावूक

 

ताज्या बातम्या बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now