आजकाल सोशल मीडियावर अनेक नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. अशातच पाकिस्ताच्या एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या पाकिस्तानी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होण्यामागे कारण म्हणजे तिची मान ९० डिग्री वाकलेली आहे.
पाकिस्तान मुलीची ९० डिग्री मान वाकलेली असल्यामुळे तिचं आयुष्य पूर्णपणे विस्कटलेलं होतं. मात्र, आता तिच्यावर भारतीय डॉक्टरांनी उपचार केले असून, तिची मान व्यवस्थित केली आहे. भारतीय डॉक्टरांनी या मुलीवर उपचार करून तिला नवं आयुष्य दिलं आहे.
या मुलीचं नाव अफशीन असून, अफ़शीनची मान लहानपणी एका अपघातात ९० डिग्री वाकली तेव्हापासून ते आत्तापर्यंत ती तशीच होती. तिच्या मानेमुळे ती शाळेत जाऊ शकत नव्हती. कोणासोबत खेळू शकत नव्हती. पण, आता एका भारतीय डॉक्टरांनी अफ़शीनवर मोफत शस्त्रक्रिया करत तिला नवं आयुष्य दिलं आहे.
मुलीवर उपचार करणारे डॉक्टर दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलचे आहेत. त्यांचं नाव राजगोपालन कृष्णन आहे. त्यांनी अफ़शीनच्या आयुष्याला नवी कलाटणी दिली आहे. अफ़शीन ही पाकिस्तानच्या सिंध प्रांतात राहते. ती १० महिन्यांची असताना एका अपघातात तीची मान ९० डिग्री वाकली गेली.
अफशीनचे आई वडिल तिच्या या उपचारासाठी अनेक डॉक्टरांकडे गेले पण काहीही फायदा झाला नाही. वाढत्या वयासोबत अफ़शीनच्या वाकलेल्या मानेचा त्रासही वाढत होता. यात तिच्या आईवडिलांकडे उपचारासाठी पैसेही नव्हते. १२ वर्षापासून अफ़शीन हे दु:ख सहन करत होती.
https://www.instagram.com/afsheengul786/channel/
ती शाळेत जाऊ शकत नव्हती, ती खेळू शकत नव्हती एवढंच काय तर तिला खाणे, पिणे, बोलणे तसेच नीट चालताही येत नव्हते. अफ़शीनच्या कुटुंबीयांना वाटले की, आपल्या तिची मान वेळेनुसार सुधारेल मात्र तसे काहीही झाले नाही. उलट तिला सेरेब्रल पाल्सीचा त्रास व्हायला लागला. यामध्ये ऐकण्याच्या आणि पाहण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.