दक्षिण आफ्रिकेविरुद्धची(South Africa) कसोटी मालिका भारताने २-१ अशी गमावली आणि एकदिवसीय मालिका ३-० इतक्या मोठ्या फरकाने गमावली. या पराभवामुळे भारतीय क्रिकेट संघावर(Indian Cricket Team) टीका होत आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभवावर मोठं वक्तव्य केलं आहे.(indian bowler mohamad shammi blame indian battsmen for losing matches)
जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी हा दक्षिण आफ्रिका दौऱ्यादरम्यान भारतीय कसोटी संघात होता. मोहम्मद शमीने कसोटीमधील भारताच्या पराभवावर वक्तव्य केलं आहे. भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवासाठी भारतीय फलंदाजांना जबाबदार ठरवलं आहे. भारताने पहिला कसोटी सामना जिंकून चांगली सुरवात केली होती. पण नंतरच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला.
एका मुलाखतीमध्ये गोलंदाज मोहम्मद शमीने सांगितले की, आमची बॅटींग चांगली झाली नाही. या कारणामुळेच आम्हाला पराभव सहन करावा लागला. आमच्या बॉलर्सने खूप चांगली कामगिरी केली हे विसरता कामा नये. ही एक सकारात्मक बाजू आहे. बॉलर्सनी कायम मॅचमध्ये संधी निर्माण केली. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका संघाला दुसऱ्या कसोटी सामन्यात २४० धावांचे तर तिसऱ्या कसोटी सामन्यात ११३ धावांचे लक्ष दिले होते.
या मुलाखतीत गोलंदाज शमी पुढे म्हणाला की, आमची बॅटींग यंदा थोडी खराब झाली. आम्हाला त्याची किंमत मोजावी लागली. आमच्याकडे दोन्ही टेस्टमध्ये ५० ते ६० धावा अतरिक्त असत्या तर मॅच जिंकण्याची मोठी संधी होती. भारतीय संघातील बॅटींगमधील कमतरता लवकरच दूर होईल, अशी आशा गोलंदाज मोहम्मद शमीने व्यक्त केली.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोहम्मद शमीने उत्तम गोलंदाजी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या महत्वाच्या फलंदाजांची विकेट घेतली. या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांनी सुमार कामगिरी केली. भारतकडून या कसोटी मालिकेतील सलामी फलंदाज केएल राहुल आणि मयांक अग्रवाल या दोघांनीच जास्त धावा काढल्या.
केएल राहुलनं (KL Rahul) कसोटी मालिकेत भारताकडून सर्वात जास्त २४६ धावा केल्या. त्यापैकी १२३ धावा त्याने पहिल्या डावातच केल्या होत्या. त्यानंतरच्या ५ डावांमध्ये त्याने फक्त १२३ धावा काढल्या. भारताचा दुसरा सलामी फलंदाज मयंक अग्रवाल (Mayank Agarwal) याने देखील निराशा केली. त्याने पहिल्या डावात ६० धावा केल्या. त्यानंतर एका देखील डावामध्ये तो ३० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या :-
जबरदस्त ऑफर! Apple चा ‘हा’ फोन मिळतोय २० हजारापेक्षा कमी किंमतीत, आजच खरेदी करा
PHOTO: ‘कपिल शर्मा शो’मधील चंदू चायवाल्याची बायको आहे खुपच सुंदर, बड्या अभिनेत्रींनी पडतील फिक्या
वेस्टइंडीविरूद्ध रोहित पुन्हा संघात आल्यावर कोणाची होणार हकालपट्टी, ‘ही’ नावं आहेत चर्चेत