Share

india : आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यासह भारताने सिरीजही जिंकली, ‘हे’ ठरले विजयाचे हिरो

team

india win series against south africa  | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली आहे. भारतीय संघाने ही मालिका २-१ ने जिंकली आहे. तिसरा एकदिवसीय सामना नुकताच संपला असून हा सामना भारतीय संघाने ७ विकेट्सने जिंकला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना आफ्रिकन संघाला फक्त ९९ धावाच करता आल्या. त्यामुळे भारतीय संघाला १०० धावांचे लक्ष्य मिळाले होते. जे शुभमन गिलच्या ४९ धावांच्या जोरावर भारताने १९.१ षटकांत सहज पुर्ण केले आहे. या सामन्यासोबतच भारताने मालिकाही जिंकली आहे.

नाणेफेक जिंकल्यानंतर शिखर धवनने दक्षिण आफ्रिकेला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. या सामन्यासाठी डेव्हिड मिलर आफ्रिकेचा संघाचा कर्णधार होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या आफ्रिकन संघाची फलंदाजी चांगली झाली नाही. या सामन्यात हेनरिक क्लासेन सर्वात चांगली फलंदाजी केली. त्याने ३४ धावा केल्या. त्याच्याशिवाय येनामन मलान (१५ धावा) आणि मार्को जॉन्सन (१४ धावा) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

याशिवाय सर्व खेळाडूंना केवळ एक अंकी धावा करता आल्या. या सामन्यात डेव्हिड मिलरनेही ७ धावांची खेळी खेळली. त्यामुळे आफ्रिकेने भारताला १०० धावांचे लक्ष्य दिले. भारताविरुद्धच्या वनडेमधली ही सर्वात कमी धावसंख्या आहे. त्यामुळे हा सामना भारताने सहज जिंकला.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजीमध्ये वाईटरित्या फ्लॉप झालेली टीम इंडिया या सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करताना दिसली. संघासाठी सर्व गोलंदाजांची कामगिरी अप्रतिम होती. दुसरीकडे, कुलदीप यादव भारतासाठी हिरो ठरला. त्याने संघासाठी ४.१ षटकात १८ धावा देत ४ बळी घेतले.

दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज आणि शाहबाज अहमद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. आवेश खान आणि शार्दुल ठाकूर यांना मात्र एकही विकेट घेता आली नाही. मात्र, संघासाठी तगडी गोलंदाजी करताना आवेशने ५ षटकांत केवळ ८ धावा दिल्या. यादरम्यान त्याने एक मेडन ओव्हरही टाकला.

दक्षिण आफ्रिकेने दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी भारतीय संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. संघाचा कर्णधार आणि सलामीवीर शिखर धवन ८ धावांवर धावबाद झाला. टीम इंडियाला दुसरा झटका ईशान किशनच्या रूपाने बसला, जो फक्त १० धावांवर बसला. त्यानंतर शुभमन गिलने ४९ तर श्रेयस अय्यरने २८ धावांचे योगदान दिले. याशिवाय संजू सॅमसन २ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाने हा सामना ७ विकेटने जिंकला.

महत्वाच्या बातम्या-
VIDEO: करोडपती बनताच ढसाढसा रडला शाश्वत गोयल, आईची कहाणी सांगताना डोळे झाले ओले
Raj Thackeray : महापालिकेसाठी राज ठाकरेंनी आखला मास्टर प्लॅन; ‘या’ सहा M च्या साहाय्याने जिंकणार निवडणूक
China: १९६७ मध्ये भारताने चीनला चारली होती धुळ, ३ किलोमीटर मागे पळून गेली होती चिनी सेना

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now