(IND vs SL) भारत विरूद्ध श्रीलंका दरम्यान तीन T20 सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. त्याचा पहिला सामना ३ डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. जिथे पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या या सामन्यात भारताचा विजय झाला.
प्रथम फलंदाजी करताना यजमानांची सुरुवात खूपच खराब झाली. मात्र अक्षर पटेल आणि दीपक हुड्डा यांच्या जलद खेळीमुळे भारतीय संघाने 163 धावांचे लक्ष्य ठेवले, जे दासून शनाकाच्या श्रीलंकेला गाठण्यात अपयश आले आणि भारताने लंकेच्या तोंडातून हिरावला विजयाचा घास.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने श्रीलंकेसमोर 5 विकेट गमावून 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. खराब सुरुवात असूनही, अक्षर पटेल आणि दीपक हुडा यांच्या शानदार भागीदारीमुळे टीम इंडियाने पाच विकेट गमावून 162 धावा केल्या. भारताकडून दीपक हुड्डा याने 23 चेंडूत 41 धावा केल्या.
याशिवाय ईशान किशनने ३७, अक्षर ३१ आणि हार्दिकने २९ धावा जोडल्या. हे चार खेळाडू वगळता एकाही भारतीय फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही सगळे लवकर बाद झाले. दुसरीकडे कासून रजिथा हा एकमेव श्रीलंकेचा गोलंदाज होता ज्याने एकही विकेट घेतली नाही. इतर सर्व गोलंदाजांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
प्रत्युत्तरात दिलेले लक्ष्य गाठण्यासाठी फलंदाजीला आलेल्या श्रीलंकेच्या संघाला चांगली सुरुवात करता आली नाही. 12 धावांवर संघाला पहिला धक्का बसला. श्रीलंकेकडून दासुन शनाका याने सर्वाधिक ४५ धावा केल्या. या दोघांशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला चांगली कामगिरी करता आली नाही.
डावाची सुरुवात करताना सलामीवीर पथुम शनाका आणि कुसल मेंडिस अनुक्रमे 1 आणि 28 धावांवर बाद झाले. चारिथ अस्लंका (12) आणि भानुका राजपक्षे (10) हेही छोटे डाव खेळून पॅव्हेलियनमध्ये परतले. त्याचवेळी धनजया सिल्वा आणि महिष थेक्षाना यांना दोन अंकी आकडाही स्पर्श करता आला नाही. वानिंदू हसरंगानेही २१ धावा केल्या.
शेवटच्या षटकात श्रीलंकेला विजयासाठी १३ धावांची गरज होती. सामना थरारक होता. पण स्वता फास्ट गोलंदाजी करण्याऐवजी पांड्याने मोठा डाव खेळला. आणि तोच डाव धोबीपछाड ठरला. पांड्याने स्पिनर काढत अक्षर पटेलला गोलंदाजी करायला दिली. अक्षरने विश्वास सार्थ करत भारताला विजय मिळवून दिला. श्रीलंकेला ३ धावांनी पराभव पत्करावा लागला.
जर आपण वेगवान गोलंदाज शिवम मावीबद्दल बोललो तर त्याने आज भन्नाट गोलंदाजी केली. आपल्या कारकिर्दीची चांगली सुरुवात करत त्याने पहिल्याच षटकात एक विकेट घेतली. श्रीलंकेच्या डावातील दुसऱ्या चेंडूवर आणि पहिल्या षटकातील पाचव्या चेंडूवर मावीने सलामीवीर पथुम निसांकाला बाद केले.
यानंतरही शिवम मावीची धोकादायक गोलंदाजी सुरूच होती. त्याने आपल्या दुसऱ्या षटकातील पाचव्या चेंडूवर धनंजय डिसिल्व्हाला बाद करून आपली दुसरी विकेट घेतली. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेल्या शिवम मावीचा प्रथमच भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. मावी अंडर-19 संघाचा भाग आहे.
शिवम मावीला यापूर्वी 23 डिसेंबर रोजी झालेल्या IPL मिनी लिलावात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने खरेदी केले होते. शिवम मावीची मूळ किंमत 40 लाख रुपये होती आणि फ्रँचायझीने त्याला 6 कोटी रुपयांना खरेदी केले. शिवम मावीने 2018 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले.
तो कोलकाता नाईट रायडर्सकडून 32 सामने खेळला आहे. त्याच्या नावावर 30 विकेट्स आहेत. शिवम मावीची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 21 धावांत 4 बळी. मावीने 2021 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला होता. शिवम मावी 2018 मध्ये अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता. देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो उत्तर प्रदेशकडून खेळतो.
महत्वाच्या बातम्या
हार्दीक पांड्याची जागा घेण्यासाठी ‘हा’ मराठमोळा खेळाडू सज्ज; एकट्याच्या बळावर संघाला जिंकवतोय
टीम इंडियात निवड न झाल्याने दुखावलेल्या पृथ्वी शाॅची भावनिक पोस्ट; डीपीही टाकला काढून
शरीरावर एकही कपडा उरला नव्हता; भूमी पेडणेकरने सांगीतला इंटिमेट सीन करतानाचा भयानक अनुभव