India win by 5 wickets against pakistan | आशिया चषकमधील भारत-पाकिस्तान यांचा सामना अखेर पार पडला आहे. कित्येक दिवसांपासून या सामन्याची चाहते वाट पाहत होते. अखेर हा सामना पार पडला असून या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. ५ विकेट्सन हा सामना भारताने जिंकला आहे. हार्दिक पांड्या या सामन्याच हिरो ठरला आहे.
प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाकडून मोहम्मद रिजवान आणि कर्णधार बाबर आझम सलामीस आले. या सामन्यात आझमला मोठी खेळी करता आली नाही आणि तो १० धावा करत बाद झाला. रिजवानने दमदार फलंदाजी करत ४२ चेंडूत सर्वाधिक ४३ धावा केल्या. इफ्तिखार अहमद २२ चेंडूत २८ धावा केल्या. तसेच फखर जमानने ६ चेंडूत १० धावा केल्या. त्याचबरोबर शाहनवाज दहनीने ६ चेंडूत १६ धावा केल्या. याच्या व्यतिरिक्त चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या उभारता आली नाही.
तसेच भारताकडून गोलंदाजी करत गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. या सामन्यात भुवनेश्वर कुमारने ४ षटकात २६ धावा देत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर त्याला साथ देत हार्दिक पांड्याने ४ षटकात २५ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. तसेच युवा गोलंदाज अर्षदीप सिंह ३.५ षटकार ३३ धावा देत २ विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर आवेश खानने ही २ षटकात १९ धावा देत १ विकेट घेतली.
त्याचबरोबर फलंदाजी करताना भारताकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल सलामीस उतरले. मात्र या सामन्यात केएल राहुलला आपले खातेही उघडता आले नाही आणि तो शून्यावर बाद झाला. तर रोहितने १८ चेंडूत १२ धावा केल्या. तसेच विराट कोहलीने ३४ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याच्यानंतर रवींद्र जडेजा मैदानात उतरला. त्याने २९ चेंडूत ३५ धावा केल्या. त्याला साथ देत सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत १८ धावा केल्या.
तर त्यानंतर हार्दिक पांड्या मैदानात उतरत दमदार फलंदाजी केली. त्याने १७ चेंडूत ३३ धावा केल्या. त्याचबरोबर पाकिस्तान कडून मोहम्मद नवाझने ३.४ षटकात ३३ धावा देत सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच नसीम शाहने ४ षटकात २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. यासह भारताने उत्कृष्ट कामगिरी करत ५ विकेट्सने सामना जिंकला. यासह भारताने गेल्या वर्षीच्या टी-२० विश्वचषकचा बदला घेतला आहे.
महत्वाच्या बातम्या-
माजी मुख्यमंत्र्यांचा काँग्रेस नेतृत्वाला सल्ला; ‘पवार साहेबांना पंतप्रधानपदाचे उमेदवार जाहीर करा’
दसरा मेळाव्यावरून आदित्य ठाकरे आक्रमक; थेट शिंदे गटावर सोडले टीकेचे बाण, वाचा काय म्हणाले?
कुणी आमचा नाद करायचं नाय…! 50 खोक्यांच्या घोषणेवरुन शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले भडकले