Share

India : झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताचा ७१ धावांनी दणदणीत विजय, ‘हे’ खेळाडू ठरले सामन्याचे हिरो

indian team

india win against zimbabwe | भारतीय संघाने सुपर-१२ मधील शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा ७१ धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि केएल राहुल यांनी शानदार खेळी खेळली आहे. यानंतर गोलंदाजांनीही चांगली गोलंदाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

आता सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा सामना इंग्लंडशी होणार आहे.भारतीय संघाने गोलंदाजी करताना चांगली सुरुवात केली. भुवनेश्वर कुमारने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. यानंतर अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमीने जबरदस्त खेळ दाखवला. झिम्बाब्वे संघाने आपल्या ५ विकेट लवकर गमावल्या होत्या.

भारताकडून रविचंद्रन अश्विनने ३ विकेट्स घेतल्या आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद शमीने २, हार्दिक पांड्याने २ आणि भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग आणि अक्षर पटेलने १-१ बळी घेतले. या सामन्यात गोलंदाज अतिशय किफायतशीर ठरले. तसेच त्यांनी विकेट्सही खुप लवकर घेतल्या.

भारतीय संघाची फलंदाजीची सुरुवात चांगली झाली नाही. जेव्हा कर्णधार रोहित शर्मा मोठी खेळी न खेळता पॅव्हेलियनमध्ये परतला. तेव्हा केएल राहुलने तुफानी खेळी खेळली. कर्णधार रोहित शर्मा (१५) लवकर बाद झाला. यानंतर विराट कोहलीने केएल राहुलसोबत ४८ चेंडूत ६० धावांची भागीदारी केली, मात्र कोहली झेलबाद झाला. पुढच्याच षटकात राहुलने ३४ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पुढच्याच चेंडूत ३५ चेंडूत ५१ धावा करून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.

केएल राहुल आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने आक्रमक खेळी खेळली. त्याने अवघ्या २५ चेंडूत ६१ धावा केल्या, ज्यात ६ चौकार आणि ४ लांब षटकारांचा समावेश होता. त्याच्यामुळेच भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारता आली. त्यामुळे टीम इंडियाने झिम्बाब्वेला जिंकण्यासाठी १८७ धावांचे लक्ष्य दिले होते. पण त्यांना ते पुर्ण करता आले नाही.

दरम्यान, या सामन्यात संधी मिळालेल्या ऋषभ पंतला मोठी खेळी खेळता आली नाही. ऋषभ पंतने ३ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने ऋषभ पंतला टी २० वर्ल्डकप २०२२ मध्ये पहिल्यांदाच संधी दिली होती. पण तरीही ऋषभ पंतला मोठी कामगिरी करता आली नाही.

महत्वाच्या बातम्या-
kl Rahul : दोन अर्धशतकानंतर लगेचच अहंकारी झाला केएल राहूल? केले ‘हे’ हैराण करणारे वक्तव्य
Rohit Sharma : झिम्ब्बाब्वेविरुद्धही लवकर बाद झाल्यामुळे रोहित ट्रोल; संतप्त चाहते म्हणाले, थोडी तरी लाज वाटू दे…
Sania mirza : सानिया मिर्झा-शोएब मलिक वेगळे होणार? सानिया मिर्झाच्या ‘त्या’ पोस्टने उडाली खळबळ

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now