india win against bangladesh | टी २० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकला आहे. भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे सेमी फायनलमधील स्थान पक्के केले आहे. हा सामना खुपच थरारक होता. पण शेवटच्या षटकात अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केल्यामुळे भारतीय संघाला हा सामना जिंकता आला आहे.
या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकला होता. त्यामुळे भारतीय संघ पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरला होता. या सामन्यात केएल राहूलने ५० धावांची खेळी केली आहे. तर विराट कोहलीने ६४ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतीय संघाला १८४ धावांचा मोठा स्कोर करता आला होता.
त्यामुळे बांगलादेशला १८५ धावांचे लक्ष्य मिळाले, जे सामन्यात पावसामुळे १६ षटकात १५१ धावा असे झाले. लिटन दासच्या स्फोटक सुरुवातीशिवाय एकाही फलंदाजाला प्रभावी खेळी करता आली नाही, त्यामुळे बांगलादेश फक्त १४५ धावाच करता आल्या आणि भारतीय संघाने हा सामना ५ धावांनी जिंकला.
दरम्यान,केएल राहुलच्या खेळीने भारताला मजबूत स्थितीत आणले होते. याचा फायदा घेत सूर्यकुमार यादवने मोठे शॉट्स खेळण्यास सुरुवात केली. दुसरीकडे विराट कोहलीही चांगल्या धावा करत होता. सूर्यकुमार यादवने १६ चेंडूत ३० धावांची दमदार खेळी केल्यानंतर त्याने आपली विकेट गमावली.
त्यानंतर विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली. विराट कोहली अखेरपर्यंत ६२ धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या षटकात रविचंद्रन अश्विनने आक्रमक फलंदाजी केली. अश्विनने ६ चेंडूत १३ धावा केल्या, ज्यामुळे भारतीय संघाला १८४ धावा करता आल्या.
महत्वाच्या बातम्या-
India : भारताने बांगलादेशला लोळवले; ठरला वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत एंट्री करणारा पहीला संघ
kl rahul : आता १० सामन्यांची जागा पक्की; बांगलादेशविरुद्ध अर्धशतक ठोकूनही केएल राहूलला झाला ट्रोल
Nitin Raut : भारत जोडो यात्रेत नितीन राऊत गंभीर जखमी; डोळा फुटला, डोक्याला गंभीर दुखापत