Share

भारत vs श्रीलंका दुसरा T20 सामना आज; वाचा कधी, कुठे आणि कसा Live पाहता येईल हा सामना

टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या T20I मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळवला. वेगवान गोलंदाज शिवम मावीने पदार्पणातच चमकदार कामगिरी केली. त्याने 4 विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग आाजारी असल्यामुळे उत्तर प्रदेशच्या या वेगवान गोलंदाजाला संधी मिळाली.

आता जर अर्शदीप दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त झाला तर तो कोणाच्या जागी खेळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याशिवाय युझवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळू शकते. तर संजू सॅमसन दुखापतग्रस्त झाला आहे.

टीम इंडियाच्या टॉप ऑर्डरबद्दल बोलायचे झाले तर इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन हे तिघेही अपयशी ठरले. दुसऱ्या सामन्यात ते चांगली फलंदाजी करतील अशी आशा आहे. सॅमसन दुखापतग्रस्त झाला आहे. तो खेळला नाही तर राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळू शकते.

हार्दिक पांड्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. तर दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी चांगली फलंदाजी केली. संघाला विजयी धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी दोघांनीही चांगली कामगिरी केली. गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल फ्लॉप ठरले.

चहलने फक्त दोन षटके टाकली. त्याने या षटकांमध्ये 26 धावा दिल्या. दुसरीकडे, श्रीलंकेच्या फिरकीपटूंबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी भारतीय फलंदाजांवर सुरूवातीपासूनच नियंत्रण ठेवले होते. अशा परिस्थितीत चहलऐवजी कुलदीप यादवला दुसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. त्याचवेळी हर्षल पटेलने 2 विकेट घेतल्या, पण त्याने 4 षटकात 41 धावा दिल्या.

जर अर्शदीप सिंग दुसऱ्या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त असेल तर त्याला हर्षल पटेलच्या जागी प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळू शकते. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे हार्दिक पंड्याने गोलंदाजी करत श्रीलंकेला अडचणीत आणले होते. उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी अतिशय उत्तम गोलंदाजी केली.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११- इशान किशन, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन/राहुल त्रिपाठी, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल/अर्शदीप सिंग, शिवम मावी, युझवेंद्र चहल/कुलदीप यादव, उमरान मलिक.
जाणून घेऊया मॅचच्या प्रक्षेपण आणि ऑनलाइन टेलिकास्टशी संबंधित सर्व माहिती…

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 कधी आहे?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना गुरूवार, ५ जानेवारीपासून खेळवला जाणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 कोठे खेळवला जाईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा T20 कधी सुरू होईल?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.00 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक 6:30 वाजता होईल.

सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होईल?
स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे भारत विरुद्ध श्रीलंका T20 आणि एकदिवसीय मालिकेचे प्रसारण करण्याचे अधिकार आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.

फोन किंवा लॅपटॉपवर लाईव्ह मॅच कशी बघायची?
भारतातील हॉटस्टार अॅपवर या सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल. याशिवाय तुम्ही www.mulukhmaidan.com वर सामन्याशी संबंधित बातम्या, लाइव्ह अपडेट्स आणि रेकॉर्डही वाचू शकता.

T20I मालिकेसाठी दोन संघ पुढीलप्रमाणे आहेत.
भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम मावी, इशान किशन, संजू सॅमसन, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, उमरान मलिक, मुकेश कुमार.

श्रीलंका : दासुन शनाका (कर्णधार), पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, चरित अस्लंका, धनंजया डी सिल्वा, वानिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, सदिरा समरविक्रमा, कुसल मेंडिस, भानुका राजपक्षे, अशेन बंदरा, महिष टेकन, महिष दूतान, राजदुस, शनिका राजपाक्षे, अशेन बंडारा, दिनुका राजपक्षे. वेल्लालेज, प्रमोद मदुशन, लाहिरू कुमारा, नुवान तुषारा.

ताज्या बातम्या खेळ

Join WhatsApp

Join Now