Share

जगभरात तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; भारतातील पेट्रोलच्या दराबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

Petrol

पेट्रोलियम कंपन्यांनी देशातील प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. सलग १३० व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जैसे थे ठेवले आहेत. पण मागील आठवड्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत(International Market) कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. हे दर आणखी कमी होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.(india petrol price rate company take this decision)

त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दरामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला नाही. सोमवारी कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव ३.६ टक्क्यांनी कमी झाला आहे. US WTI कच्च्या तेलाच्या भावात ३.९३ टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे सोमवारी US WTI कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १०५.४० डॉलर इतका झाला आहे.

पण मागील सोमवारी कच्च्या तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. मागच्या सोमवारी कच्च्या तेलाचा भाव प्रति बॅरल १३९.९३ डॉलर इतका होता. २००८ नंतर हा कच्च्या तेलाचा सर्वाधिक भाव होता. पण त्यानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाचा भाव १०० डॉलर खाली येईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. आज मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोलचा भाव ९५.४१ रुपये आहे. दक्षिण भारतातील चेन्नई शहरात पेट्रोलचा भाव १०१.५१ रुपये इतका आहे. तर पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता शहरात पेट्रोलचा भाव १०४.६७ रुपये आहे.

आज मुंबईत एक लिटर डिझेलचा भाव ९४.१४ रुपये इतका आहे. तर दिल्लीत एक लिटर डिझेलचा भाव ८६.६७ रुपये आहे. चेन्नई शहरात डिझेलचा भाव ८९. ७९ रुपये झाला आहे. भोपाळमध्ये ग्राहकांना एक लिटर डिझेलसाठी ९०.८७ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण होऊनही भारतातील सर्व प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर सारखेच आहेत.

भारत देश मोठ्या प्रमाणावर इंधनाची आयात करतो. एकूण इंधन मागणीपैकी ८० ते ८५ टक्के इंधन भारतात आयात केले जाते. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरावर अवलंबून असतात. दररोज सकाळी पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर घोषित करतात.

महत्वाच्या बातम्या :-
‘शरद पवारांनी मुंबईला अंडरवर्ल्डपासून वाचवलं’; मोदींच्या वक्तव्याने भाजप तोंडावर आपटली
हास्यजत्रेच्या मंचावर येणार शेवंता, अपूर्वा नेमळेकर पहिल्यांदाचं कॉमेडी करताना दिसणार
ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठी जाणाऱ्या चिमुकलीला स्वत:चे हेलिकॉप्टर देऊन नाना पटोले रेल्वेने मुंबईला रवाना

ताज्या बातम्या इतर

Join WhatsApp

Join Now